Ind Vs Nz 3rd Test Mumbai – टीम इंडियात मोठा बदल, ‘या’ खेळाडूचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण?
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलग दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला आणि मालिका सुद्धा 2-0 अशी खिशात घातली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 1 नोव्हेंबर पासून मुंबईमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
न्यूझीलंडच्या विजयी रथाला ब्रेक लावण्यासाटी टीम इंडिया सज्ज झाली आहे. व्हाईट व्हॉशच्या नामुष्की पासून वाचण्यासाठी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या हेतून टीम इंडिया मैदानात उतरेल. यासाठी टीम इंडियाने संघात महत्त्वपूर्ण बदल केला असून वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हर्षित राणाचा मुंबईच्या मैदानार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हर्षित राणाची आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली आहे. तसेच हर्षित राणा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
हर्षित राणाने रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली कडून खेळताना आसामविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेत अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजी सोबत फलंदाजी करण्यात माहिर असल्यामुळे 22 वर्षीय हर्षित राणाची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघात निवड करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List