साय-फाय – शहराचे आरोग्य

साय-फाय – शहराचे आरोग्य

>> प्रसाद ताम्हनकर

गेल्या काही दशकांपासून हवामान बदलाचा वेग जोमाने वाढला आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम जगभरात मोठय़ा प्रमाणावर जाणवू लागले आहेत. जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी 50 टक्के नागरिक हे शहरात राहतात. मात्र 2050 पर्यंत ही आकडेवारी 70 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शहरी भागांमध्ये हवामान बदलाचे तीव्र पडसाद उमटत असताना जगभरातील प्रमुख देश याचा सामना करण्यासाठी कितपत सज्ज आहेत याचा एक अभ्यास येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, द रेझिलिएंट सिटीज नेटवर्क आणि द रॉकफेलर फाऊंडेशन यांच्यातर्फे नुकताच करण्यात आला.

52 देशांच्या 118 शहरांतील 200 प्रमुख नेत्यांचे सर्वेक्षणदेखील या वेळी करण्यात आले. हवामान बदलाच्या धोक्याची त्यांना कितपत माहिती आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी काय तयारी केली आहे, त्यांच्या योजना काय आहेत यासंदर्भात माहिती घेण्यात आली. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाच्या शहरांचा व नेत्यांचा यात समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे हिंदुस्थानातील पुणे, अहमदाबाद आणि सुरत या शहरांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. शहरांचा विस्तार होत असताना समस्यांचाही त्याच वेगाने होणारा विस्तार, हवामान बदलाचा शहरावर आणि शहराच्या आरोग्यावर होणारा परिणाम याचा या अभ्यासात समावेश आहे.

शहरांची वाढती लोकसंख्या हा मोठा चिंतेचा विषय आहे. वाढती बांधकामे आणि तापमान कमी करण्यासाठी मदत करणारी हिरवी वनक्षेत्र झपाटय़ाने नष्ट होणे, हे चिंतेचे कारण आहे. अनेक शहरांमध्ये असलेल्या जुन्या आणि ढासळलेल्या नागरी सुविधा या समस्या मोठी करण्यास हातभार लावत आहेत. ठराविक लोकसंख्येसाठी निर्माण करण्यात आलेल्या या पुरातन सुविधा हवामान बदलाने अचानक उद्भवणारे पूर, वादळ यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी अपुऱया पडत आहेत. शहरातील दुर्बल वर्गावर याचा परिणाम इतरांपेक्षा जास्त पडत असल्याचे आढळून आले आहे. हवामान बदलाच्या समस्येमुळे शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ऋतूमधील बदल आणि वाढत्या तापमानामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा धोका मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे. अशा वेळी आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या शहरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक शहरांत पाणी पुरवठा, कचऱयाची विल्हेवाट आणि आरोग्य सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. मजूर, वृद्ध, लहान मुले, स्थलांतरित आणि झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणारे लोक प्रामुख्याने या दुष्परिणामांचा सामना करत आहेत.

सर्वेक्षण करण्यात आलेल्या शहरांपैकी निम्म्याहून कमी शहरांनी हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी तयारी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे यासंदर्भात एक ठाम योजना होती, तर चारपैकी एका शहराने हवामान बदल आणि आरोग्य अशा दोन्हीकडे नीट लक्ष दिले जात असल्याचे सांगितले. प्रामुख्याने वाढते तापमान, पूर आणि वायू प्रदूषण या सर्वात जास्त भेडसावणाऱया समस्या असल्याचे अनेक शहरांच्या सर्वेक्षणात दिसून आले. एकीकडे ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह ही प्रमुख शहरे डास व डेंग्यूशी लढा देत असताना मियामी, दुबईसारखी किनारपट्टीवरील शहरे समुद्राची पातळी वाढल्याने पुराच्या शक्यतेच्या चिंतेत आहेत.

या चिंताजनक गोष्टींसोबत काही शहरे हरित ऊर्जेला देत असलेले महत्त्व, नवी उद्याने उभारून हिरव्या क्षेत्रात घालत असलेली भर याचे कौतुकदेखील करण्यात आले आहे. शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची मुख्य मागणी या अहवालात करण्यात आली आहे. यामुळे वैश्विक निरोगीपणात वाढ होईल आणि हवामान बदलाचा प्रतिकार करण्याचे ते प्रमुख शस्त्र बनेल. वृक्षारोपण वाढवणे, नागरिकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे, पूर, वादळे, अतिवृष्टी यांसारख्या समस्यांशी सामना करू शकतील अशा आधुनिक नागरी सुविधा उभारण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. अशा समस्या येण्यापूर्वी त्यांचा अंदाज बांधू शकणारी यंत्रणा उभी करणे आणि प्रत्येक नागरिक तिच्याशी जोडला जाणे हेही महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या मदतीने जागतिक आरोग्य वाढविण्यावर यात भर देण्यात आला आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ
राज्यात निवडणुकीला रंग चढला आहे. प्रचाराच्या तोफा आता थोड्याच दिवसात थंडावतील. त्यापूर्वी आमदार, नेते आणि कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार करत...
निवडणुकीच्या धामधुमीत कॉमनमॅनच्या भावनांना साजेसं रॅप साँग; तरुणांकडून भरभरून प्रतिसाद
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजेवर संकट; लीला यातून कसा काढणार मार्ग?
“ब्रेकअपनंतर सिंघम अगेनच्या सेटवर अर्जुनची अवस्था…”; रोहित शेट्टीकडून खुलासा
“त्यांना गमावल्यानंतर..”; वडिलांच्या आत्महत्येबद्दल पहिल्यांदाच मलायका अरोरा व्यक्त
मतदान करणाऱ्यास पेट्रोल फ्री मिळणार
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ, व्हीव्हीआयपी रांगेत तरुणाची घोषणाबाजी; सुरक्षारक्षकांची धावपळ