Census – देशात 2025 पासून जनगणना सुरू होणार?
देशात जनगणना करण्यास केंद्रातील मोदी सरकार चार वर्षांपासून टाळाटाळ करीत आहे. परंतु आता पुढील वर्षी 2025 पासून जनगणनेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 2026 पर्यंत ही जनगणना पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. यापूर्वी 2011 मध्ये जनगणना झाली. मात्र, कोरोनामुळे 2021 मध्ये ती लांबणीवर पडली. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून देशात जातीनिहाय जनगणना घ्यावी, अशी मागणी होत आहे; परंतु केंद्र सरकार टाळाटाळ करीत आहे. परंतु 2025 पासून जनगणनेला सुरुवात होईल, असे वृत्त आहे. एक वर्ष जनगणनेची प्रक्रिया चालेल. त्यानंतर अहवाल येईल. जनगणनेमुळे लोकसंख्या, लोकांचा सामाजिक-आर्थिक स्तर काय आहे? शिक्षण, रोजगाराचे प्रमाण किती? या बाबी समोर येतील, अशी शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List