भाजपचा नवाब मलिकांना नकार असताना तुम्ही तिकीट का दिलं? अजित पवारांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

भाजपचा नवाब मलिकांना नकार असताना तुम्ही तिकीट का दिलं? अजित पवारांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवार यांची मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. भाजप नवाब मलिक यांना नाकारते, पण तुम्ही नवाब मलिकांना तिकीट देताय, महायुतीत नेमकं काय घडतंय? असा प्रश्न अजित पवारांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. “संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य, विचारधारा दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये जे आपल्याला योग्य वाटतं त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही. पण जे वाटत नाही त्याबद्दल बोलून पुढे गेलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवारांना हा विचारधारेचा क्लॅश नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा एक आहे का?”, असा उलट सवाल केला. “वेगवेगळ्या व्यक्ती आल्यानंतर त्यांचे विचार आणि मत बदलतात. अलिकडेच आपल्या महाराष्ट्राने 1989 नंतर ठरवलं आहे की, कोणत्याही एका पक्षाला बहुमताचं सरकार द्यायचं नाही. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन काम करावं लागतं. या घटना होत राहणार आहेत. जोपर्यंत महाराष्ट्राला एका व्यक्तीच्या हातात पूर्ण सत्ता द्यावीशी वाटत नाही तोपर्यंत असं चालत राहील. कारण प्रत्येक भागातील वेगवेगळी विचारधारा आहे”, असं अजित पवार म्हणाले. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांचा बहुमत लागतं. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट द्यावं लागतं, असंदेखील अजित पवारांनी यावेळी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं.

नवाब मलिकांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

नवाब मलिक म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर समीकरणे वेगळे होतील. हे संकेत काय? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “हे नवाब मलिकांचं स्वत:चं मत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पक्षाचं मत काय आहे, त्याला महत्त्व आहे. शेवटी आम्ही सर्व एकत्र बसून आमच्या पक्षाचं मत आणि भूमिका काय आहे ते ठरवतो. आम्ही प्रमुख लोकं एकत्र बसलो, त्यातील 15 लोकांनी एक मत व्यक्त केलं आणि 6 लोकांनी वेगळं मत व्यक्त केलं. पण तरी त्या 6 लोकांना 15 जणांचं मत ऐकून पुढे जावं लागतं. पण मत व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना आहे. मग लोकशाही नाही, मग हुकूमशाही झाली”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

निवडणुकीनंतर वेगळे समीकरण येतील?

निवडणुकीनंतर वेगळे समीकरण येतील का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “आता किती लोकं काय-काय बोलतात. मी ते सांगितलं तर महाराष्ट्र बोलेल अजित पवार तेच बोलत आहेत. मला तेच शब्द उच्चारायचे नाहीत. माझं म्हणणं आहे की, तुम्ही या गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. महायुतीला भरघोस मतांनी निवडून आणायचं या कामाला लागलेलो आहोत”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. निवडणुकीनंतर अजित पवार ज्यांच्यासोबत त्यांची सत्ता असं झालं तर? असं अजित पवारांना विचारलं असता “मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत”, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली ‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली
मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे गाढवाचा मेळा भरवला जातो. चित्रकूट जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गाढवाचा सुरु होतो, जो पुढील काही...
शास्त्र असतं ते! खेळाडू नेहमी च्युइंगम का चघळतात? फॅशन नसून आहे खास कारण
हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे, द्या कचराकुंडीत टाकून; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे: जयंत पाटील
Justice Chandrachud Retires: सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड निवृत्त, शेवटच्या दिवशी झाले भावुक; म्हणाले….
Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
अजितदादामध्ये बदल का झाला…अजित पवार यांनी सांगितले ते कारण