व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होण्याचा धोका, या गोष्टींचे सेवन उपयोगी
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल फंक्शन कमकुवत होऊ शकतात. यामुळे सक्रीय असणाऱ्या नसा खराब होऊ शकतात. तसेज दृष्टी निरुपयोगी होऊ शकते. एनसीबीआयवर उपलब्ध संशोधनानुसार, अशा रुग्णांना व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर करून मदत मिळू शकते.
शाकाहारी असलेले फोर्टिफाइड न्यूट्रिशनल यीस्ट खाल्ल्याने व्हिटॅमिन बी12 ची कमतरता बरी होऊ शकते. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थच्या मते, यामध्ये चांगले जैवउपलब्धता आहे. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची पातळी खूप लवकर वाढवते. यासोबत तुम्ही फोर्टिफाइड ब्रेकफास्ट सीरिअल्स देखील खाऊ शकता.
गाय, म्हैशीपासून मिळणाऱ्या दुधात व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असतो. डेअर प्रॉडक्ट तुमच्या नसा आणि डोळ्याचा कमकुवतपणा दूर करतात. परंतु ज्यांना याची एलर्जी आहे, ते या पदार्थांचे सेवन करु नये.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List