कानातली घाण बाहेर काढण्यासाठी या घरगुती गोष्टींचा करा वापर, काही मिनिटांत सर्व घाण बाहेर
शरीराची स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे शरीराची जर स्वच्छता केली नाही तर आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येवू शकते. आपल्या शरीराचा कान हा महत्त्वाचा भाग आहे जो आपल्याला ऐकण्यास आणि समजण्यास मदत करतो. ज्याप्रमाणे आपले शरीर घाण होते त्याचप्रमाणे कानात देखील घाण साचते. याला इअरवॅक्स असे म्हणतात.
बऱ्याचदा कानातली घाण काढण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधत असतो. पण योग्य उपाय न सापडल्यामुळे कानातली घाण आपण साफ करू शकत नाही. तर आज आपण कानातले घाण साफ करण्यासाठी काही सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल कानातली घान मोकळी करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे ते बाहेर पडणे सोपे होते. त्याचा वापर करण्यासाठी ऑलिव्हलचे काही थेंब गरम करा. डॉक्टरच्या मदतीने ते कानात घाला. डोकं थोडावेळ झुकवून ठेवा, ज्यामुळे ते कानात व्यवस्थित जाईल. काही वेळानंतर कापसाच्या मदतीने कान स्वच्छ करा.
खोबरेल तेल
खोबरेल तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म पदार्थ असतो जो कानात संक्रमण टाळण्यासाठी आणि कानातील घाण काढून टाकण्यासाठी मदत करतो. त्याचा वापर करण्यासाठी खोबरेल तेल थोडेसे गरम करा. त्यानंतर तेलाला ड्रॉपरच्या मदतीने कानात टाका. पाच ते दहा मिनिटानंतर कान साफ करा.
गरम पाणी
कानाचा बाहेरचा भाग कोमट पाण्याने स्वच्छ केल्यास आतील मळ सैल होऊन बाहेर यायला सुरुवात होते. त्याचा वापर करण्यासाठी कोमट पाण्यात एक स्वच्छ कापड घेऊन पाण्यात बुडवून तो पिळून घ्या. तो कापड कानाच्या बाहेरील बाजूस लावून काही वेळ तसाच राहू द्या. यामुळे कानातील घाण बाहेर येण्यासाठी मदत होईल.
लसूण तेल
लसूण तेल कानात होणारे संक्रमण रोखण्यासाठी आणि कानातील घाण साफ करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्याचा वापर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल मध्ये लसणाच्या काही पाकळ्या गरम करा. त्यानंतर तेल थंड होऊ द्या आणि ड्रॉपरने कानात घाला. सुमारे दहा मिनिटानंतर कान स्वच्छ करा.
काळजी घ्या
काहीही कानात घालण्यापूर्वी त्याचे प्रमाण आणि उष्णता लक्षात ठेवा. कानात कोणतीही वस्तू खोलवर टाकू नका जेणेकरून कानाचा पडदा खराब होईल. या कोणत्याही उपायामुळे तुम्हाला जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा त्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही सहजपणे कानातील घाण काढू शकता आणि संसर्ग देखील टाळू शकता.
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List