स्नायूंच्या बळकटीसाठी ‘हे’ तीन तेल आहेत वरदान, वेदना झटक्यात होतात दूर
खरं तर स्नायूंना सुडौल बनवण्यासाठी वर्कआऊटसोबतच नियमित मसाजही खूप गरजेचं आहे. स्नायूंना बळकटी देण्यासाठी फक्त जिममध्ये जाणं पुरेसं नाही हे तुम्हाला माहित आहे का? आत्तापर्यंत असाच विश्वास असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.
साहजिकच स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला 3 प्रकारच्या तेलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या नियमित वापराने वर्कआऊटचा योग्य फायदा होतो. जाणून घ्या.
बदामाचे तेल
वर्कआउटनंतर जर तुमचे स्नायूही दुखत असतील तर बदामाच्या तेलाने मालिश केल्यास तुम्हाला बराच आराम मिळू शकतो. सौंदर्य वाढवण्यासाठी हे तेल बऱ्याच काळापासून वापरले जात आहे, पण स्नायूंना बळ देण्यासाठीही हे तेल फायदेशीर आहे हे तुम्हाला क्वचितच माहित असेल. हे तेल त्वचा खूप लवकर शोषून घेते आणि त्वचेची जळजळ किंवा पुरळ यासारख्या समस्या देखील दूर करते.
तिळाचे तेल
आयुर्वेदात शतकानुशतके तिळाच्या तेलाचा वापर केला जात आहे. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्हाला माहित आहे का तिळाचे तेल आपल्या स्नायूंना मजबूत बनवू शकते? खरं तर यात असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म जळजळ कमी करतात आणि वेदना कमी करतात. रोज या तेलाने मालिश केल्याने स्नायूंमध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो, शिवाय स्नायूंचा कडकपणा आणि कमकुवतपणाही दूर होतो.
नारळ तेल
नारळ तेल केवळ केस आणि त्वचेसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी देखील आहे. यामुळे हिवाळ्यात तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार तर होतेच, शिवाय तुमचे केस ही मजबूत आणि निरोगी राहतात. याशिवाय नारळ तेलात असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आपल्या शरीराचे संसर्गापासून संरक्षण करतात. दररोज नारळ तेलाने शरीराला मसाज केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात आणि तणावमुक्त वाटते.
साहजिकच स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला 3 प्रकारच्या तेलांबद्दल सांगितले आहे. नारळ तेल केवळ केस आणि त्वचेसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आहे. बदान तेल स्नायूंना बळ देण्यासाठीही फायदेशीर आहे. हे तेल त्वचेत खूप लवकर शोषून घेते आणि त्वचेची जळजळ किंवा पुरळ यासारख्या समस्या देखील दूर करते. तर आयुर्वेदात शतकानुशतके तिळाच्या तेलाचा वापर केला जात आहे. अशा प्रकारे हे तिन्ही तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List