नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 48 लाख जोडपी अडकणार विवाहबंधनात , 6 लाख कोटींची होणार उलाढाल
दिवाळीनंतर देवउठणी एकादशीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) नुसार यंदा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जवळपास 48 लाख लग्न होणार आहेत. त्यामुळे 6 लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता कॅटने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यंदा लग्नाचे 18 शुभ मुहूर्त आहेत.
कॅटने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी लग्नाचा सीझन देवउठणी एकादशी 12 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून 16 डिसेंबर पर्यंत असणार आहे. यावेळी लग्नाच्या मूहूर्तांच्या तिथ्यांमध्ये वाढ झाल्याने व्यापारात वाढ होऊन उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागच्या वर्षी 11 मुहूर्त होते. त्यापैकी 35 लाख लग्न झाली त्यातून जवळपास 4.25 कोटींचा व्यापार झाला होता. यावर्षी तो वाढून 6 लाख कोटी होण्याची शक्यता आहे. यावर्षी 12, 13, 17, 18, 22, 23, 25, 26, 28, 29 नोव्हेंबर तर 4, 5, 9, 10, 11, 14, 15, 16 डिसेंबरला लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत. त्यानंतर महिनाभर लग्नमुहूर्त नाहीत. त्यानंतर 2025मध्य़े मध्य जानेवारीपासून पुन्हा मुहूर्त सुरु होऊन मार्च पर्यंत असतील. कॅटनुसार, देशभरातील 75 शहरांमधील व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कळले की, यावेळी उपभोक्त्याच्या खरेदी व्यवहारात मोठे बदल आहेत. आता ते हिंदुस्थानी सामान खरेदी करण्याकडे जास्त भर देतात.
कपडे, साड्या, लेहेंगा आणि इतर पोशाख 10 टक्के, दागिने 15 टक्के, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि ग्राहकोपयोगी वस्तू 5 टक्के, सुका मेवा, मिठाई आणि स्नॅक्स 5 टक्के, किराणा आणि भाज्या 5 टक्के, भेटवस्तू 4 टक्के आणि इतर वस्तू पण सामान्यतः 6 टक्के खर्च केला आहे. याशिवाय बँक्वेट हॉल, हॉटेल आणि लग्नाच्या ठिकाणी 5 टक्के, इव्हेंट मॅनेजमेंट 3 टक्के, तंबू सजावट 10 टक्के, खानपान आणि सेवा 10 टक्के, फ्लॉवर डेकोरेशन 4 टक्के, वाहतूक आणि कॅब 3 टक्के, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी 2 टक्के, ऑर्केस्ट्रा, 3 टक्के संगीत इत्यादींवर, 3 टक्के लाईट आणि साउंड आणि 7 टक्के इतर सेवांवर खर्च केला जातो.
प्रति नंबर लग्नाचा खर्च
10 लाख 3 लाख रुपये
10 लाख 6 लाख रुपये
10 लाख 10 लाख रुपये
10 लाख 15 लाख रुपये
07 लाख 25 लाख रुपये
50 हजार 50 लाख रुपये
50 हजार 1 कोटीहून अधिक खर्च
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List