दिल्लीत कारचालकाचा मुजोरपणा, वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून 100 मीटर फरफटत नेले
दिल्लीत धक्कादायक घटना समोर आली आहे. बेर सराय येथे कार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसांना बोनेटवरून 100 मीटर फरफटत नेले. यात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये एएसआय प्रमोद सिंग आणि एचसी शैलेश चौहान एक पांढऱ्या रंगाची कार थांबवण्याचा प्रयत्न करत असताना कार यू-टर्न घेत होती. मात्र चालकाने गाडी थांबवली नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बोनेटवर लटकले. तरीही कारचालक थांबला नाही आणि पोलिसांना 100 मीटर फरफटत नेले.
यानंतर त्याने कारला ब्रेक मारला, त्यामुळे एक ट्रॅफिक पोलीस हवालदार खाली पडला. पुन्हा ब्रेक मारला असता दुसरा पोलीस खाली पडला. त्यानंतर कार चालक फरार झाला. यावेळी काही लोकांनी कारचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. पोलीस फरार वाहनचालकाचा शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List