फडणवीसांचा दावा केंद्र सरकारने खोटा ठरवला, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने दिला धक्कादायक अहवाल

फडणवीसांचा दावा केंद्र सरकारने खोटा ठरवला, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने दिला धक्कादायक अहवाल

 

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील 10 वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातची विशेष प्रगती झाली असून गुजरातचा वाटा 8 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. 2010 मध्ये 15 टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पिछेहाट होऊन हा वाटा 13 टक्क्यांपर्यंत घटला आहे. गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याची गुंतवणूक हिरावून विकास साधत आहे. दक्षिणेत भाजपची सत्ता नाही, तिथल्या राज्यांनी प्रगतीची नवी वाट धरल्याचे दिसून येते. यावरून भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्राला घातक ठरली आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ घालणाऱ्या शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही भाजपा युती सरकारला आता सत्तेतून खाली खेचल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता स्वस्थ बसणार नाही.

2014 पासून भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार आल्यापासून सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातसह दुसऱ्या राज्यात जाणीवपूर्वक वळवली जात आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून कमी निधी दिला जातो, महाराष्ट्राची प्रगती गुजरातच्या डोळ्यात सतत खुपत आली आहे. महाराष्ट्राची पिछेहाट होत असतानाही एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करून महाराष्ट्र आघाडीवरच असल्याचा खोटा व फसवा दावा करत आहेत. केंद्रातील भाजपा सरकारनेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचे अधोरेखीत केले आहे, त्यावर तरी फडणविसांनी विश्वास ठेवायला हवा. विरोधकांना अहवालच वाचता येत नाही अशा थापा फडणविसांनी मारु नयेत, फुले शाहू आंबेडकरांनी बहुजनांना ही शिक्षित केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते. महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या भाजपा, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंच्या सरकारला आता घरी बसवले तरच महाराष्ट्राची प्रगती होईल अन्यथा महाराष्ट्राला हे डबल इंजिनवाले कंगाल करतील, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप Uddhav Thackeray : ‘कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी; खाणी ते शाळाही अदानीला दिल्या’, उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून...
Uddhav Thackeray : “मिंध्या तु मर्दाची औलाद असलास…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना भरसभेत आव्हान
‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“श्रीवल्ली मेरी बायको, पुरी दुनियाको दिखाएगा…” ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार ट्रेलर; रोमान्सपासून ते एक्शनपर्यंत सर्वच खतरनाक!
चरबी कमी करण्यासाठी दररोज प्या ‘हे’ 5 पेय
बुद्धी तल्लख बनवायची असेल तर रोज अंडी खा, अभ्यासकांचा दावा
मुंबई, महाराष्ट्रावर अदानीच्या सुलतानीचे संकट; उद्धव ठाकरे यांचा घणाघात