ही निवडणूक महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाची लढाई – कन्हैय्या कुमार

ही निवडणूक महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाची लढाई – कन्हैय्या कुमार

महाराष्ट्राला थोर संतांचा वीरांचा वारसा लाभला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले की, सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी उपस्थित होते. महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातच्या व्यापाराच्या हातात गेले. महाराष्ट्रातील प्रकल्प, जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्याच्या घशात घालण्यात आल्या. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. महाराष्ट्राची ही निवडणूक तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आहे, अशी टीका काँग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांनी केली.

आरमोरी इथे आज महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्हैया कुमार यांच्यासह विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका केली, ते म्हणाले की, निवडणुकीत भाजप अडचणीत आली की त्यांना धर्म आठवतो. धर्मांधतेच्या नावावर विष पेरून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व गुजरातच्या चरणी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवणाऱ्यांना धडा शिकवा, असा प्रहार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यावेळी कन्हैया कुमार म्हणाले की, भाजपवाले हे धर्मयुद्ध असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे. हे धर्मयुद्ध असेल तर आम्ही पण सोबत आहोत. पण हे युद्ध रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी लढणारं आहे का? असा सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी हे जुमलेवादांचे सरदार आहे. ते सांगतात आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालोत. मात्र वास्तव्यात येथील 80 कोटी जनता आजही पाच किलो मोफत धान्याच्या रांगेत उभी आहे. सत्तेच्या अहंकारात भाजप सरकार हे उद्योगपती अदानीचे हित जोपासत आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून उद्योग पळविणाऱ्या तरुणांच्या हातून काम हिरावणाऱ्या महायुतीला सत्तेतून बेदखल करा, असे आवाहन त्यांनी केले.

तर उपस्थिताना संबोधित करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर म्हणाले की, महाराष्ट्रातील लुटारू, असंवैधानिक, खोकेबाज सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज माफ, महिला भगिनींना प्रतिमाह 3000 रुपये, सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार रुपये प्रतिमाह बेरोजगार भत्ता, महिलांना मोफत एसटी प्रवास व विविध विकास योजना कार्यान्वित करणार आहोत. आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात वरखडे गुरुजींना आमदार केलं आता रामदास मसराम या गुरुजींना आमदार करू, ते नक्कीच विजयी होतील, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

खासदार डॉक्टर किरसान म्हणाले की, लोकसभेत ज्या मताधिक्याने तुम्ही मला निवडून दिले त्याच एकसंघ व एकजुटीने रामदास मसराम गुरुजींना निवडून द्या. काँग्रेस पक्षाने तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाने मला उमेदवारी दिली, या विश्वासावर खरा उतरून मी जनसेवेकरिता कार्य करेन, असे महाविकास आघाडी उमेदवार रामदास मसराम म्हणाले. आयोजित सभेस बहुसंख्येने महिला भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत
असे म्हटले जाते की जगात सात लोकं एकसारखी दिसतात. अभिनेत्रींमध्येही असं पाहायला मिळतं एका अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या किंवा थोड्याफार प्रमाणात साम्य...
… संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू – राहुल गांधी
… हा बाण बाळासाहेबांचा नाही तर, मोदी-शहा यांनी चोरलेला बाण; कैलास पाटील यांचा हल्लाबोल
एकदाच यांना गाडून मूठमाती द्यायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरे कडाडले
महाराष्ट्र सरकार शेतकरीविरोधी, भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा! नाना पटोले
Video – चिमुकल्याच्या घोषणांनी उद्धव ठाकरे भारावले; जाहीर सभेत सत्कार
मिशी लावून कोणी पृथ्वीराज चौहान होऊ शकत नाही, मुकेश खन्ना यांचा अक्षय कुमारला टोला