सोनम कपूरने घातला चक्क ‘मुलतानी अन् लाल माती’चा ड्रेस; दिवाळीसाठी खास लूक
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर फॅशनिस्टसुद्धा आहे. तिला वेगवेगळ्या पद्धतीचे, फॅशनचे आउटफिट परिधान करायला आवडतात. अनेकदा सोनम तिच्या अतरंगी आउटफिटमुळे चर्चेत राहिली आहे.
आताही सोनम कपूर तिच्या कपड्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त हटके ड्रेसमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोनमने माती आणि खादीचा ड्रेस परिधान केला आहे. होय, कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून बनवलेली चोळी घातली असून आणि खादीचा लेहंगा व ओढणी त्यावर घेतली आहे. दिवाळीसाठी सोनमने हा खास लूक केला आहे.
सोशल मीडियावर सोनमने तिचे काही फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे "हे आऊटफीट कर्नाटकमधील लाल आणि मुलतानी मातीपासून बनवलेला आहे. त्याबरोबरच लेहेंगा आणि ओढणी ही खादीची आहे. हा पोशाख भूमीशी असलेले आपले संबंध दाखवून देतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List