ना शुगर, ना ब्लड प्रेशर.. तरीही ‘या’ आजारातून विकी कौशलची होऊ शकणार नाही कधीच सुटका
सेलिब्रिटी कायम त्यांना होणाऱ्या आजाराबद्दल बोलत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील तिच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला होता. आलिया भट्ट हिला एडीएचडी (ADHD) नावाचा आजार आहे. ज्यामुळे आलिया कधीच कोणत्या गोष्टीवर अधिक काळ लक्ष केंद्रीत करु शकत नाही. फक्त आलिया हिनेच नाही तर, अभिनेता विकी कौशल याने देखील स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. विकी कौशलला असा आजार आहे ज्यातून अभिनेत्याची कधीच सुटका होऊ शकणार नाही.
विक्की कौशलनेही अनेकवेळा खुलासा केला आहे की, तो चिंतेने ग्रस्त आहे. विकी कौशल म्हणतो, मला कायम घाबरल्यासारखं वाटतं… तेव्हा विकीना एक ज्येष्ठ अभिनेत्याने दिलेला सल्ला देखील सांगितला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याच्या आजाराची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विकी म्हणाला, ‘मला एक ज्येष्ठ अभिनेत्याने सल्ला दिला आहे. आजाराशी डील करण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे त्याच्याशी मैत्री कर… आजार आता कायम तुझ्यासोबत राहाणार आहे. त्यामुळे स्वतःची समज घालायची आता तो कायम माझ्यासोबत असणार आहे…’
स्वतःला सर्जनशीलपणे कोणत्याही कामात व्यस्त ठेवायचं असं देखील विकी म्हणाला. सिनेविश्वात विकी याला दिग्दर्शन क्षेत्रात देखील फार आवड आहे. त्यामुळे अभिनेता दिग्दर्शनाचा देखील सखोल अभ्यास करतो. अशात दिग्दर्शक म्हणून कधी समोर येणार असा प्रश्न देखील अभिनेत्याला विचारण्यात आला.
यावर विकी म्हणाला, ‘दिग्दर्शन क्षेत्रातील अनेक पैलूंचा अभ्यास करायला मला आवडतं. पण दिग्दर्शकाच्या खुर्ची बसण्याचा अद्याप विचार केला नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला. सांगायचं झालं विकी कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.
विकी कौशल याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री करतरिना कैफ हिच्यासोबत लग्न केल्यानंतर विकी अधिक चर्चेत आला. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर विकी – कतरिना कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात. शिवाय अनेकदा कुटुंबासोबत देखील दोघांना स्पॉट करण्यात आलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List