शिल्पा शिरोडकर फेक तर, ईशा व ॲलिस गॉसिप चाची”; बिगबॉसच्या घरातून बाहेर येताच नायराचे धक्कादायक खुलासे!
‘बिग बॉस’चा आठवडा हा अनेक ट्विस्टने भरलेला रंजक असा पाहायला मिळाला. पहिल्यांदाच एकाचवेळी दोन सदस्यांचे एलिमिनेशन पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या आठवड्यात नायरा बॅनर्जीला घरातून बाहेर निघाली आहे. घरातून बाहेर आल्यानंतर नायरा बॅनर्जीने मुलाखतीदरम्यान तिचे घरातील आणि घरातील सदस्यांबद्दलचे अनुभव सांगित अनेक खुलासे केले आहे. तसेच तिच्या एलिमिनेशनबद्दलही मत व्यक्त केले आहे.
मला लोकं डॉमिनेटींग समजतात…
नायराचा म्हटलं की तिला लोकं डॉमिनेटींग समजतात. पण तिने या आरोपावर स्पष्टपणे तिचा नकार दर्शवला आहे.
ती म्हणाली “जेव्हा मी स्वयंपाकघराचे नियम बनवले तेव्हा मला कोणी आव्हान का दिले नाही? माझे ऐकून सर्वजण का बसले?”, नायराने ती तिच्या मतावर ठाम असल्याचे दाखवून दिले.
चाहत पांडे नेहमी स्वत:चा बचाव करते…
नाय़राला चाहत पांडेबद्दल विचारला असता तिने सांगितले की “चाहत खूप शांत असते.असं वाटतं तिला कशाचीच चिंता नसते. ती ग्रुपमध्ये बसूनही बोलत नाही. तीने कधीही घरात आपले मत मांडले नाही. ती फक्त स्वत:चा बचाव करते.” तसेच नायरा हेही म्हणाली की घरातील सर्वच सदस्य हे खरे वागत नाही.
ईशा आणि “ॲलिस गॉसिप चाची”
जेव्हा नायराला ईशा आणि ॲलिस यांच्यातील मैत्रीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की “ती त्यांच्या मैत्रीने खूप प्रभावित आहे आणि तिच्याकडेही अशीच मैत्री असावी अशी इच्छाही तिने व्यक्त केली. पण सोबतच या दोघींना तिने ‘गॉसिप चाची’ म्हणून चिडवलं. तर नायराने शिल्पा शिरोडकरला फेक म्हटलं आहे. शिल्पा कायम ‘विक्टम कार्ड’ खेळते असंही तिने सांगितले. शिल्पामध्ये अजिबातच लढण्याची इच्छा नसल्याचं नायराने सांगितले. जेव्हा नायराला विचारण्यात आले की तिला टॉप 5 मध्ये कोण दिसते, तेव्हा तिने करणवीर आणि रजत यांची नावे घेतली.
दरम्यान या ‘वीकेंड का वार’ ला बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी आणि अजय देवगण ‘सिंघम अगेन’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या मंचावर आले होते. त्यांनी सदस्यांसोबत खूप धमाल केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List