संजूबाबाच्या मुलाचा डॅशिंग लूक, बापापेक्षी कमी नाही लेक, दोघांचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Sanjay Dutt Son: अभिनेता संजय दत्त आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. चाहते आजही संजूबाबाच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. , संजय दत्त आता फक्त बॉलीवूडच नाही तर साऊथ सिनेसृष्टीतही हिट चित्रपट देत आहे. कधी तो खलनायकात तर कधी साऊथच्या सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसतो. याशिवाय संजय दत्त हा एक कौटुंबिक माणूस आहे. जो त्याची तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि जुळ्या मुलांची पूर्ण काळजी घेताना दिसतो. शिवाय अभिनेत्याला अनेकदा कुटुंबासोबत स्पॉट देखील करण्यात येतं.
सांगायचं झालं तर, संजय – मान्यता यांना जुळी मुलं आहेत. अभिनेत्याची मुलगी आणि मुलगा आता 14 वर्षांचे झाले आहेत. सध्या अभिनेत्याच्या मुलाची चर्चा रंगली आहे. संजूबाबाच्या मुलाचं नाव शहरान दत्त असं आहे. शहारान दत्तचा जन्म 21 ऑक्टोबर 2010 रोजी झाला होता आणि आता तो 14 वर्षांचा आहे.
शाहरानला फुटबॉल खेळण्याची खूप आवड आहे आणि तो अल नासर 14 वर्षाखालील संघाचा सदस्य आहे. शाहरानचे स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट असून त्यावर तो फुटबॉल खेळतानाचे व्हिडिओ शेअर करत असतो. शहरान याला इन्स्टाग्रामवर 78 हजार पेक्षा अधिक नेटकरी फॉलो करतात. संजूबाबाचा मुलगा जगज्जेता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा चाहता आहे.
संजय दत्तचा मुलगा मोठा झाल्यावर काय होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण शाहरान कराटे देखील शिकते. शहरान सोशल मीडियावर फक्त फुटबॉलचेच व्हिडीओ नाही तर, कुटुंब आणि मित्रांसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
संजय दत्तने 2008 मध्ये गोव्यात मान्यता दत्तसोबत लग्न केलं. लग्नानंतर मान्यताने जुळ्या मुलांना जन्म दिला. शहरानचे बालपणीचे फोटो पाहिले तर तो स्टार वडील संजय दत्त याची हुबेहुब कॉपी आहे. अभिनेत्याच्या मुलाचं नाव शहरान आणि मुलीचं नाव इकरा असं आहे.
शहरान आणि मुलीचं इकरा यांच्याशिवाय संजूबाबाला आणखी मुलगी आहे. जी 35 वर्षांची आहे. संजूबाबाच्या पहिल्या मुलीचं नाव त्रिशाला दत्त असं आहे. त्रिशाला ही रिचा शर्मा आणि संजय दत्त यांची मुलगी आहे. रिचा शर्मा हिचं कर्करोगामुळे निधन झालं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List