बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या दिवशी काय घडलं? हत्येमागे कोण? झिशान सिद्दिकींनी सांगितलं
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यावर हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. मात्र ही घटना घडली तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत बाबा सिद्दिकी यांचा मुलगा, आमदार झिशान सिद्दिकी यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे.
हत्या झाली त्या दिवशी काय घडलं?
जेवढी माहिती माध्यमात येत आहे. तेवढीच माहिती माझ्याकडेही आहे. मी आणि माझे वडील माझ्या ऑफिसमध्ये होतो. कामाबद्दल बोलत होतो. त्याच वेळी भूक लागली म्हणून तिथं जवळच एक उडुपी रेस्टॉरंट आहे. तिथे इडली खायला गेलो होतो. त्यानंतर दोन मिनिटांनी माझे वडील तिथून निघाले. मी त्यांच्याशी बोललो. दोन मिनिटांनी ते तिथून गेले आणि ही घटना घडली, असं झिशान यांनी सांगितलं.
आता निवडणूक होत आहे आणि अशा दिवसांमध्ये वडील माझ्यासोबत नाहीयेत. असं कुणाही सोबतही होऊ नये. दोन मिनिटांच्या आत एका कुटुंबाला तुम्ही निराधार करता. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही अशी मागणी करतो की आम्हाला न्याय मिळावा, असं झिशान सिद्दिकी यांनी म्हटलंय.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List