भाजपने दिला विदर्भातील दोन आमदारांना नारळ, मुंबईतील एकही उमेदवार जाहीर नाही
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम असताना भाजपने आज 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. वाशीमचे आमदार लखन मलिक आणि गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांचा पत्ता कट केला आहे. स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधाला न जुमानता भाजपने विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांना सांगलीच्या जतमधून विधानसभेच्या मैदानात उतरविले आहे. मात्र मुंबईतील एकाही उमेदवाराचे नाव या यादीत नाही.
भाजपने 20 ऑक्टोबरला 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. एकूण 121 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने चिंतेत असलेल्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे, कुमार आयलानी, रवींद्र पाटील, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, प्रकाश भारसाकळे आणि समाधान आवताडे यांना दुसऱ्या यादीत स्थान दिले आहे.
भाजपने धुळे ग्रामीणमधून राम भदाणे, मलकापूरमधून माजी आमदार चैनसुख संचेती, दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी प्रतिनिधित्व केलेल्या अकोला पश्चिम येथून विजय कमलकिशोर अग्रवाल, वाशीममधून श्याम खोडे, गडचिरोलीतून डॉ. मिलिंद नरोटे, लातूर ग्रामीणमधून रमेश कराड, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने, सांगली जिह्यातील शिराळा मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
धुळे ग्रामीण ः राम भदाणे, मलकापूर ः चैनसुख संचेती, आकोट ः प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिमः विजय कमलकिशोर अग्रवाल, वाशीम ः श्याम खोडे, मेळघाट ः केवलराम काळे, गडचिरोली ः डॉ. मिलिंद नरोटे, राजुरा ः देवराव भोंगळे, ब्रह्मपुरी ः कृष्णलाल सहारे, वरोरा ः करण संजय देवतळे, नाशिक मध्य ः देवयानी फरांदे, विक्रमगड ः हरिश्चंद्र भोये, उल्हासनगर ः कुमार आयलानी, पेण ः रवींद्र पाटील, खडकवासला ः भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट ः सुनील कांबळे, कसबा पेठ ः हेमंत रासने, लातूर ग्रामीण ः रमेश कराड, सोलापूर शहर मध्य ः देवेंद्र कोठे, पंढरपूर ः समाधान आवताडे, शिराळा ः सत्यजित देशमुख, जत ः गोपीचंद पडळकर.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List