Ranji Trophy 2024-25 – दिवाळी धमाका! रजत पाटीदारने केली चौकार आणि षटकारांची आतषबाजी, 68 चेंडूत ठोकले शतक
रणजी करंडकात हरयाणाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात रजत पाटीदारने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आहे. ताबडतोब फलंदाजी करत त्याने फक्त 68 चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे.
मध्य प्रदेश आण हरयाणा या संघांमध्ये 26 ऑक्टोबरपासून इंदूरमध्ये सामना सुरू झाला आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात रजत पाटीदारचे वादळ गोंगावले. रजतच्या बॅटीतून तोफेच्या गोळ्याप्रमाणे चेंडू मैदाना बाहेर फेकले जात होते. 155 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्याने हरयाणाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 68 चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि 102 चेंडूंमध्ये 159 धावा कुटून काढल्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि खणखणीत 7 षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 94 धावा केल्या. रजत पाटीदारचे हे शतक रणजी करंडकातील चौथे सर्वात वेगवान शतक ठरले आहे.
या सामन्यात मध्य प्रदशने प्रथम फलंदाजी करताना 308 धावा केल्या होत्या. प्रत्तुत्तरात लक्ष्य दयालच्या (105 धावा) शतकाच्या जोरावर हरयाणाच्या संघाने 440 धावा केल्या. मध्य प्रदेशने आपल्या दुसऱ्या डावात 4 गड्यांच्या मोबदल्यात 308 धावा करत डाव घोषित केला होता. मात्र दुसऱ्या डावात हरयाणाचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे सामना अनिर्णीत राहिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List