Maharashtrachi Hasyajatra: लग्न होताच पृथ्वीक प्रतापने उचलला दोन मुलांचा खर्च; पण का? कारण जाणून म्हणाल…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने नुकताच सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना चकित केलं आहे. कोणताच गाजावाजा न करता पृथ्वीक याने अत्यंत साधेपणात लग्न उरकलं आहे. अभिनेत्याच्या पत्नीचं नाव प्राजक्ता वायकूळ असं आहे. अभिनेत्याने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पृथ्वीकने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हे नवीन फोटो शेअर केले आहेत.
लग्नाचे फोटो पोस्ट करत पृथ्वीकने खास कॅप्शन देखील दिलं आहे. बायको सोबत फोटो पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘५-१०-२०२४… एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.’ असं आकर्षक कॅप्शन अभिनेत्याने पोस्ट करत दिलं आहे.
सांगायचं झालं तर, इतर सेलिब्रिटींप्रमाणे पृथ्वीक आणि प्राजक्ता यांनी थाटामाटात नाही तर, अगदी साधेपणात लग्न केलं आहे. याचं कारण देखील अभिनेत्याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. लग्न होतात पृथ्वीक आणि पत्नीने दोन मुलांच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.
लग्नानंतर झालेल्या एका मुलाखतीत पृथ्वीक याने साधेपणात लग्न का केलं यामागचं कारण सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘आयुष्यातील खास क्षण मला कुटुंबियांसोबत साध्या पद्धतीने साजरा करायचा होता. लग्नाचा संपूर्ण खर्च आम्ही दोघांनी एका सामाजिक कारणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.’
‘आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आम्ही आमच्या लग्नाचा खर्च दोन मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरणार होतो. असं काही तरी करून एखाद्याचं आयुष्य सुंदर बनवता येत असेल तर हेच आमच्या लग्नाचं खास गिफ्ट आहे… असं आम्हाला दोघांना देखील वाटतं..’ पृथ्वीक आणि बायकोच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
लग्नातील पृथ्वीक – प्राजक्ताचा खास लूक
सोशल मीडियावर सध्या पृथ्वीक – प्राजक्ता यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये पृथ्वीक याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर, पायत मोजडी घातली आहे. तर प्राजक्ता हिने ऑफ व्हाईट व सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. दोघांच्या गळ्यात मोगऱ्याच्या फुलांच्या वरमाळा आहेत. शिवाय प्राजक्ता हिच्या हातातील हिरव्या बांगड्या आणि मेंहदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List