डेविड धवन यांनी परदेशात मुलाला दिली धमकी, ‘रस्त्यावर उतरवेल आणि…’
Varun Dhawan: ‘बडे मिया छोटे मिया’ आणि ‘कुछ-कुछ होता है’ या दोन सिनेमांनी चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आजही चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. पण याच दोन सिनेमांमुळे दिग्दर्शक डेविड धवन आणि मुलगा वरूण धवन यांच्यामध्ये वाद झाले होते. एवढंच नाही तर, डेविड यांनी मुलाला धमकी देखील दिली होती. वरून याने मुलाखतीत एक किस्सा सांगितला. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते आणि वरूण याला ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा आवडला. ज्यामुळे वडिलांनी अभिनेत्यावर संताप व्यक्त केला.
1998 मध्ये ‘बडे मिया छोटे मिया’ सिनेमाचं दिग्दर्शन डेविड धवन यांनी केलं होतं. तर दिग्दर्शक करण जोहर याने ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. दोन्ही सिनेमांमध्ये वरूण याला ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा अधिक आवडला. मुलाची ही गोष्ट डेविड यांना बिलकूल आवडली नव्हती. त्यांनी मुलावर संताप देखील व्यक्त केला. सांगायचं झालं तर, सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा वरुण आणि करण यांची ओळख देखील नव्हती.
मुलाखतीत वरुण म्हणाला, ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमाचं प्रीमियर लंडन याठिकाणी होतं. ज्यासाठी वरुण वडिलांसोबत परदेशात गेला. त्यावेळी निर्मात्यांनी त्याला घेण्यासाठी लिमोझिन पाठवली होती. ज्यावर अभिनेता गोविंदा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा फोटो लागलेला होता. प्रीमियर संपल्यानंतर वरुण वडिलांना म्हणाला, ‘मला कुछ कुछ होता है’ सिनेमा आवडला… यावर डेविड धवन यांनी संताप व्यक्त केला.
डेविड धवन मुलगा वरुण याला ओरडले, ‘आता गप्प बस नाही तरी तुला रस्त्यावर उतरवेल…’ यावर वडिलांना उत्तर देत वरुण म्हणाला, ‘तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार करू शकत नाही…’ मात्र, जेव्हा दोन्हा सिनेमे प्रदर्शित झाले तेव्हा ‘बडे मिया छोटे मिया’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.
‘बडे मिया छोटे मिया’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळाला तर ‘कुछ-कुछ होता है’ सिनेमाने चाहत्यांना सकारात्मक संदेश दिला. त्यानंतर 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमातून वरुण याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं आहे. आता वरुण फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List