Baba Siddique murder case – नऊ आरोपींच्या कोठडीत एक दिवसाची वाढ, मुख्य शूटर अद्याप फरार
अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांड प्रकरणात अटक केलेल्या 9 आरोपींची शुक्रवारी पोलीस कोठडीत 26 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्व येथील मुलगा जीशान सिद्धीकीच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अटक केलेल्या 9 आरोपींच्या कोठडीच्या समाप्तीवर अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्टॅट वी.आर.पाटील यांच्यासमोर हजर केले होते. पोलिसांनी तीन दिवसांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली, मात्र न्यायालयाने एक दिवसाची मुदतवाढ देत 26 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी हरयाणाचा रहिवासी गुरमेल बलजीत सिंह (23), उत्तर प्रदेश निवासी धर्मराज कश्यप (21) यांनी मुख्य आरोपी शिवकुमार गौतमसोबत मिळून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सिंह आणि कश्यप शिवाय पोलिसांनी प्रवीण लोंकर (30), नितीन गौतम सप्रे (32), संभाजी किसन पारधी(44), प्रदीप दत्तू थोंबरे, चेतन दिलीप पारधी(27) आणि राम फुलचंद कनौजिया (43) यांना अटक केली आहे.
या हत्येचा मुख्य सूत्रधार शिवकुमार गौतम आणि इतर मुख्य आरोपी शुभम लोणकर आणि मोहम्मद जीशान अख्तर अद्याप फरार आहेत. पोलिसांनी या तिघांविरुद्ध लुकआउट सर्कुलर (एलओसी) जारी केले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित नेटवर्कशी संबंध जोडून या हत्येचा पोलीस तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List