मुंबईत 30 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त, दोन जण ताब्यात
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. याकाळात मुंबईत 30 लाख रुपयांची रोकड घेऊन जाताना एक गाडी पोलिसांनी अडवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी नाकेबंदी सुरू आहे. यावेळी एका गाडीतून 30 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून पुढील तपास सुरू आहे.
निवडणुकीच्या काळात कुठल्याही व्यक्तीला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड नेता येत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला सोबत योग्य कागदपत्र बाळगणे बंधनकारक आहे.
Mumbai police recovered Rs 30 lakh cash from a car; two people were taken into custody and are being questioned. Income Tax department has also been informed: Mumbai Police
During the Model Code of Conduct for elections, those carrying cash above Rs 50,000 must have valid…
— ANI (@ANI) October 25, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List