TCS ने लाँच केलं NVIDIA बिझनेस युनिट, ग्राहकांना देणार अॅडव्हान्स AI सेवा
टीसीएसने आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल ठेवले आहे. एआय कंप्युटिंग क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या NVIDIA कंपनी सोबत मिळून नवीन AI व्यवसाय युनिट स्थापन करणार आहे.
देशातल्या IT सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी टीसीएसने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल ठेवले आहे. टाटा कन्सलटेन्सी सर्विसेसने NVIDIA या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने एक नवीन बिझनेस युनिट लाँच केले आहे. आणि याद्वारे ती अनेक क्षेत्रांमध्ये AI आधारित सेवा प्रदान करतील. ज्यामुळे त्यांना प्रगत तांत्रिक उपाय मिळू शकतील, जे AI च्या मदतीने चालतील.
TCS ने ही माहिती नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे. आणि असे सांगण्यात आले आहे की TCS ने NVIDIA सोबत बिझनेस युनिट सेटअपसाठी हातमिळवणी केली आहे. यासह एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले आहे.
TCS च्या या युनिटचे फायदे त्याच्या ग्लोबल एक्सलन्स सेंटर्समध्ये पाहिले जातील. जेथे NVIDIA AI प्लॅटफॉर्मद्वारे मदत केली जाईल. यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून एनव्हीडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
टाटा समूहाची कंपनी TCS ने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी NVIDIA सोबत हातमिळवणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, ती विविध उद्योगांसाठी AI सोल्यूशन्स प्रदान करेल. यामध्ये उत्पादन, बँकिंग आणि फानॅन्शिअल सेवा, टेलीकॉम, रिटेल वेअरहाउसिंग वाहनांचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List