कलाकारांच्या उपस्थिती मुंबईत रंगला ‘लाडकी बहीण चषक’; जिंकण्यासाठी संघांमध्ये चुरस
शिवसेना युवासेना मुंबादेवी विधानसभा संघटक रुपेश पाटील, महिला उपविभाग प्रमुख प्रिया पाटील यांच्या तर्फे डोंगरीतील वीर संभाजी मैदानात भव्य दिव्य आणि दिवस-रात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रसंगी अभिनेत्री प्राप्ती रेडकर, रील्स स्टार तन्मय पाटेकर यांनी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी लाडकी बहीण चषकासाठी महिला संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहण्यास मिळाली.अथर्व स्ट्रायकर संघावर मात करत समीर स्माशार या महिला संघाने विजय मिळवला असता ट्रॉफी व ११ हजार रुपये रुपयांचे रोख बक्षीस देऊन विजय संघाचा गौरवण्यात आले. प्रेक्षणीय सामन्याचे विजय ते पद आकदास फाउंडेशन ला हरवत अग्निशमन दलाने स्वतःकडे राखले.
३७ संघ, ६०० खेळाडू, आणि त्यामध्ये लहान पासून, ज्येष्ठपर्यंत सहभागी झाले होते.
८ ते ११ वयोगट:
विजेता: मुंबादेवी मावळा | उपविजेता: मुंबादेवी योद्धा
१२ ते १६ वयोगट:
विजेता: समीर Smashers | उपविजेता: सुजल इलेव्हन
महिला गट:
विजेता: समीर Smashers | उपविजेता: अथर्व स्ट्रायकर्स
9PL ओपन:
विजेता: साफिया एवेंजर्स | उपविजेता: डोंगरी वॉरियर्स
45+ गट:
प्रेक्षणीय सामन्यात मुंबई अग्निशमन दल विजेता संघ ठरला तर आकदास फाउंडेशन उपविजेता
ह्या प्रसंगी विभाग संघटक रुपेश पाटील ह्यांनी खेळाडूंच्या पालकांचे त्यांना सतत फोन येत असल्याची माहिती दिली. क्रिकेट स्पर्धेसाठी मुले अभ्यास केल्यावर थेट मैदानात खेळायला जातात असल्याची पालकांनी माहिती दिली. पण आता मोबाईल सोडून मैदानी खेळ खेळण्यात मुलांनी रस घेतल्याचे मुलांच्या आई वडिलांनी सांगितले. तुम्ही असेच कार्यक्रम करत रहा जेणेकरून मुलं मोबाईल सोडून मैदानात खेळायला उतरतील. गेल्या दीड महिन्यापासून मुले मुली रोज अभ्यास झाल्यावर मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी येत असल्याचे पालकांनी रुपेश पाटील ह्यांना सांगितले.
बक्षीस वितरण समारंभास शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे,दक्षिण विभागप्रमुख दिलीप नाईक, युवासेना कार्यकारिणी सदस्या रुची वाडकर, अभिनेत्री प्राप्ती रेडकर, तन्मय पाटेकर, विविध मान्यवर, पदाधिकारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलग तीन दिवस आयोजित केलेल्या क्रिकेटच्या सामन्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे मुंबादेवी उपविभाग प्रमुख प्रिया पाटील यांनी सांगितले. आणि त्यामुळे या कार्यक्रमाला हातभार लागून या क्रिकेट स्पर्धा भव्य दिव्य आणि दिवस-रात्र पद्धतीने पार पडल्याचे प्रिया पाटील म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List