वज्रेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात
राज्यातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाणे जिह्यातल्या भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी देवीचा यात्रोत्सव 25 ते 30 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. 26 एप्रिलला सकाळी साडेसात वाजता श्रींची महापूजा होईल. 27 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता दीपपूजा होईल. 28 एप्रिलला मध्यरात्री 12 वाजल्यापासून श्री पालखी सोहळा सुरू होईल. भाविकांनी या उत्सवाला आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन श्री वज्रेश्वरी देवी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. देवीच्या दर्शनासाठी मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणूसह राज्यभरातील भाविक येत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List