Pahalgam Attack – किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणं सोडा, महायुतीच्या श्रेयवादाच्या लढाईवर वडेट्टीवार याची टीका

Pahalgam Attack – किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणं सोडा, महायुतीच्या श्रेयवादाच्या लढाईवर वडेट्टीवार याची टीका

महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे. किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा, असं म्हणत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील पर्यटकांना धीर देण्याबरोबरच तेथून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने श्रीनगरला पाठवले होते. असे असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीर दौऱ्यावर रवाना झाले होते. दहशतवादी हल्ल्यातही महायुतीतील मंत्र्यांची आणि नेत्यांची श्रेयासाठी धडपड सुरू आहे. यातच मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत असवंदेनशील वक्तव्य केलं आहे. “जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं आहे”, असं विधान नरेश म्हस्के यांनी केलं आहे. यावरूनच X वर एक पोस्ट करत वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

X वर पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “महायुती सरकार मधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची आणि स्वतःच्या मार्केटिंगची स्पर्धा किती असावी? जे कधी विमानात बसले नाही त्यांना पण एकनाथ शिंदे यांनी विमान प्रवास घडवून आणला. ही वेळ काय, कोणी कधी कसले श्रेय घ्यायचे याचे भान राहिले नाही का? पर्यटकांना सुखरूप आणणे महत्वाचे की विमान प्रवास? आणि ते केलं म्हणून पण श्रेय घ्यायचे?”

ते म्हणाले, “पहलगाममध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला, काही जखमी झाले. काही अडकले आहे. त्यांना धीर देण्यापेक्षा सगळ्यात आधी तिथे कोण पोहचत, याची स्पर्धा झाली. गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी कश्मीर वारी केली. इथवर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले अशी भाषा करतात? महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे. किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे....
YMCA ची 150 वर्षे पूर्ण, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार
Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा
सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्यात सापडले पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू
Pahalgam Attack – सरकारच्या प्रत्येक अ‍ॅक्शनला आमचं समर्थन, सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांचं वक्तव्य
दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना लिफ्ट बंद पडली, महिला रुग्णाचा गुदमरून मृत्यू