अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा! देशाच्या सुरक्षेसाठी विरोधी पक्ष सरकारसोबत भक्कम

अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा! देशाच्या सुरक्षेसाठी विरोधी पक्ष सरकारसोबत भक्कम

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार कठोर पावले उचलत असून देशावर आलेल्या या संकटाच्या काळात आम्ही भक्कमपणे सरकारसोबत आहोत, अशी भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी आज सर्वपक्षीय बैठकीत घेतली. अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा आहे, असे विरोधी पक्षांनी सरकारला सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे बोलताना दिला.

बैठकीच्या सुरुवातीला दोन मिनिटे मौन बाळगून पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते.

सुरक्षेत चूक झाली, केंद्राने केले मान्य

पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाल्याचे सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने मान्य केले. गुप्तचर यंत्रणा काय करत होती, तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, असा प्रश्न विरोधी पक्षांनी विचारला. त्यावर ’दरवर्षी अमरनाथ यात्रेवेळी जूनमध्ये पहलगामचा हा भाग खुला केला जातो. येथे यात्रेकरू विश्रांती घेतात. मात्र स्थानिक टूर ऑपरेटर्सनी सरकारला कल्पना न देता 20 एप्रिलपासूनच पर्यटकांसाठी हा भाग खुला केला. बुकिंग घेतली. स्थानिक प्रशासनालाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था नव्हती, असे आयबी व गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर दिली.

पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीचा मुद्दा

या महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. हा मुद्दा चर्चेला आल्याची माहिती खरगेंनी दिली. त्यावर पंतप्रधानांना याबाबत ब्रिफिंग दिले जाईल, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. मात्र यावर खरगे म्हणाले, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असतात. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहून त्यांनी प्रत्यक्ष ऐकणे महत्त्वाचे ठरते.

सरकारच्या कारवाईला पूर्ण समर्थन- राहुल गांधी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला. पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी विरोधी पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिल्याचे राहुल गांधी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी कश्मीरला भेट देणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते तेथील लोकांशी संवाद साधणार आहेत.

‘पहलगाम’नंतर…

  • अमित शहा आणि जयशंकर यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट
  • अमित शहांची असदुद्दीन ओवेसींशी फोनवर चर्चा
  • घराबाहेर पडू नका; कश्मिरी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना
  • हिंदुस्थानातून माघारी जाण्यासाठी अटारी चेक पोस्टवर पाकिस्तानी नागरिकांच्या रांगा
  • पाकिस्तान सरकारच्या ‘एक्स’ हॅण्डलवर बंदी
  • परराष्ट्र मंत्रालयात बैठक; अनेक देशांचे राजदूत सहभागी
  • जम्मू–कश्मीरमध्ये न जाण्याची अमेरिकेची नागरिकांना सूचना
  • हिंदुस्थान मोठे पाऊल उचलू शकते, ‘रशिया टुडे’ने दिले वृत्त

पाकिस्तानची दर्पोक्ती

  • हिंदुस्थानला जलयुद्धाचे परिणाम भोगावे लागतील
  • 1 मेपर्यंत हिंदुस्थानी नागरिकांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश
  • सिमला करारासह सर्व द्विपक्षीय करार रद्द

हिंदुस्थानशी सर्व व्यापार थांबवले

  • अटारी–वाघा सीमा बंद
  • हवाई क्षेत्रात बंदी
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट ‘केसरी वीर: लीजेंड्स ऑफ सोमनाथ’ सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार...
मोठी बातमी! अखेर कुणाल कामराची होणार चौकशी
Pahalgam Terror Attack: ‘उद्देश केवळ लोकांना मारणे नव्हता तर…’, सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट
वादळात हरवलेलं कासव घरी परतलं
कामाची बात! स्मार्टफोनची बॅटरी लाईफ वाढवणाऱ्या टिप्स
Breaking : गद्दार गीत प्रकरणी हायकोर्टाचा कुणाल कामराला मोठा दिलासा, अटकेपासून संरक्षण
Medha Patkar Arrest – सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक, नेमकं प्रकरण काय?