पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज; हवाई दलाकडून युद्धसराव सुरु

पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज; हवाई दलाकडून युद्धसराव सुरु

जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने हवाई दलाने गुरुवारी ‘आक्रमण’ युद्धसराव देखील सुरू केला. यावेळी राफेल जेट्सच्या नेतृत्वाखालील लढाऊ ताफ्याचे शक्तिशाली प्रदर्शन करण्यात आले. हवाई दल हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हशिमारा येथे तैनात असलेली दोन राफेल स्क्वॉड्रन चालवते. ही अत्याधुनिक विमाने युद्धसरावाच्या केंद्रस्थानी आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीन वाढला आहे. पाकिस्तानने निरापराधी लोकांचा बळी घेतल्याने हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थान सर्व ताकदीनिशी सज्ज झाला आहे. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचा निर्धार करीत हवाई दलाने गुरुवारी ‘आक्रमण’ युद्धसराव सुरु केला. हवाई दलाच्या वैमानिकांनी टेकडी आणि जमिनीवरील टार्गेटवर निशाणा साधून अचूक हल्ला करण्याचा सराव केला.

उच्च तीव्रतेच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यास हवाई दलाचे वैमानिक कुठलीही हार न मानता शत्रूचे मनसुबे उधळून लावतील हे उद्दिष्ट ठेवून युद्धसराव सुरु ठेवण्यात आला आहे. पूर्व सेक्टरमधून मध्य सेक्टरमध्ये अनेक हवाई दलाची उपकरणे पाठवण्यात आली आहेत. तेथून लांब अंतरावरून शत्रूच्या ठिकाणांवर अचूक बॉम्बफेक केली जात आहे, अशी माहिती संरक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. याआधी हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार संपुष्टात आणला आहे. या माध्यमातून पाकिस्तानला कठोर संदेश देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लष्कराच्या जमिनीवर बेकायदा बांधकामे कशी? हायकोर्टाचा कल्याण-डोंबिवली महापालिकेला सवाल लष्कराच्या जमिनीवर बेकायदा बांधकामे कशी? हायकोर्टाचा कल्याण-डोंबिवली महापालिकेला सवाल
कल्याणमधील लष्कराची जमीन बळकावून त्यावर बेकायदा इमले बांधणाऱ्या विकासकाला व त्याला परवानगी देणाऱ्या पालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडे...
3699 गृहनिर्माण प्रकल्पांना खरंच भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे का? महारेरा संबंधित प्राधिकरणाकडून सत्यता तपासून घेणार
बिहारसाठी 13,500 कोटींच्या योजनांची पंतप्रधानांकडून घोषणा, विधानसभा निवडणुकीवर डोळा
पावभाजी केंद्र रात्री 10 नंतर बंद करण्याची नोटीस पुणे पोलिसांना भोवणार; हायकोर्टाने पोलिसांना धाडली नोटीस, प्रतिज्ञापत्रावर मागितला खुलासा
खड्डय़ात साचलेल्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ड्रॉची संख्या वाढवावी! शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेची सरकारकडे मागणी 
वज्रेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात