IPL 2025 – घरच्या मैदानावर ‘जोश’ दिसला अन् RCB चा ‘विराट’ विजय, राजस्थानचा केला पराभव
घरच्या मैदानावर पराभवाची हॅट्रीक करणाऱ्या RCB ने दमदार पुनरागमन करत घरच्या मैदानावरच राजस्थानचा 11 धावांनी परभाव केला आहे. बंगळुरूने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने कडवी झुंज दिली. यशस्वी जयसवाल (19 चेंडू 49 धावा), ध्रूव जुरेल (34 धावा) यांनी विस्फोटक अंदाजात धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर फलंदाज टप्याटप्याने बाद होत गेल्यामुळे संघाला विजय मिळवता आला नाही. जोश हेजलवूनडे फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. त्याने 4 विकेट घेत राजस्थानचे मनसुबे उधळून लावले आणि राजस्थानने 20 षटकांमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रथम फलंदाजी करतना विराटने (42 चेंडू 70 धावा) आणि देवदत्त पडीकल (27 चेंडू 50 धावा) दमदार कामगिरी करत संघाला 200 पार घेऊन जाण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List