‘बाप आहे नाना पाटेकर! निर्मात्याला घरी बोलावलं अन् भांडी घासून घेतली’, नेमकं काय झालं होतं?
हिंदी सिनेमात नाना पाटेकर हे पहिले अभिनेते आहेत ज्यांनी सहाय्यक भूमिकेसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती. नानांचा दबदबा असा होता की निर्मात्यांनी हसत हसत त्यांना ही मागितलेली रक्कम दिली. नाना पाटेकर यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केले. पण त्यांच्याविषयी माहिती नसलेला एक किस्सा अभिनेते परेश रावल यांनी सांगितला आहे.
नेमकं काय झालं होतं?
आपला मित्र नाना यांच्याबद्दलचा किस्सा परेश रावल यांनी द लल्लनटॉपच्या खास कार्यक्रममध्ये सांगितला. त्यांनी सांगितलं की एकदा एका निर्मात्याला घरी बोलावून नानांनी त्याच्याकडून भांडीसुद्धा घासून घेतली होती. हा किस्सा सांगताना परेश म्हणाले, “काय होतं यार, कलाकार मंडळी असतात ना, थोडीशी वाकडी असतात. खांद्यावर हात ठेवून बोललं तर एका रुपयात काम करतील. नाहीतर तुम्ही १० कोटी लावा, त्याला करायचं नसेल तर तो करणार नाही. नाना पाटेकर करायचा यार! तो पहिला सहाय्यक अभिनेता आहे, ज्याने आपल्या भूमिकेसाठी एक कोटी रुपये मागितले. हिरो लोक देखील इतके मागत नव्हते. नाना पाटेकरने मागितले आणि घेतलेसुद्धा.”
नाना पाटेकरांचा बिनधास्तपणा
नानांच्या बिनधास्तपणाच्या गोष्टी सांगताना परेश म्हणाले की, जितकं स्पष्ट परेश स्वतः बोलतात, त्यापेक्षा जास्त खरं नाना बोलतात. परेश यांनी नाना पाटेकर आणि एका निर्मात्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “एक निर्माता आहे, मी नाव घेणार नाही. नानाने त्याला म्हटलं- घरी ये. पुढे विचारलं, तू मटण-वटण खातोस का? तो घरी आला, त्याने खाल्लं. नंतर नाना म्हणाले, खाल्लंस ना! आता चल, भांडी घास. हा आहे नाना पाटेकर यार! बाप आहे. तो वेगळाच आहे. त्याने एक कोटी रुपये घेतले तेव्हा धुमाकूळ झाला होता. हिरो लोक इतके मागत नव्हते. नाना पाटेकरने मागितले आणि घेतलेसुद्धा.”
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी कोण होती? दागिन्यांसह दिला होता अग्नी
परेश यांनी सांगितलं की नाना पाटेकर किती स्पष्टवक्ते आहेत. जे मनात आहे, तेच तोंडावर बोलतात. जेव्हा परेश यांच्या बिनधास्तपणाबद्दल बोलणं झालं, तेव्हा परेश म्हणाले- “नाना तर माझ्यापेक्षा जास्त बोलून मोकळा होईल. त्याची मातीच वेगळी आहे.”
परेश रावल आणि नाना पाटेकर पहिल्यांदा १९९४ मध्ये आलेल्या ‘क्रांतिवीर’ चित्रपटात एकत्र दिसले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. यामध्ये ‘गुलाम-ए-मुस्तफा’ (१९९७), ‘आंच’ (२००३), ‘वेलकम’ (२००७), ‘कमाल धमाल मालामाल’ (२०१२) आणि ‘वेलकम बॅक’ (२०१५) यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List