मी तुला मारेन! गौतम गंभीर याला ‘ISIS’ कडून धमकीचा मेल

मी तुला मारेन! गौतम गंभीर याला ‘ISIS’ कडून धमकीचा मेल

हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या ई-मेलच्या सबजेक्टमध्ये ‘ISIS’ (इस्लामिक स्टेट) असा होता. ईमेलमध्ये फक्त तीन शब्द होते, ‘मी तुला मारेन’ (I kill you).

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, गंभीरने राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अद्याप कोणताही औपचारिक गुन्हा दाखल झालेला नसला तरी, सायबर सेल ई-मेलचे मूळ शोधण्यासाठी आणि पाठवणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जम्मू आणि कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी ही धमकी देण्यात आली आहे. हा हल्ला प्रतिबंधित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LeT) ची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटच्या सदस्यांनी केला होता. गंभीरने पूर्वी दहशतवादाविरुद्ध उघडपणे आपले मत मांडले होते. 2021 मध्ये, माजी क्रिकेटपटूलाही ISIS कश्मीरकडून अशीच धमकी मिळाली होती.

मंगळवारी गंभीरने X वर पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरच्या सर्वात घातक घटनांपैकी एक म्हणजे, बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. ‘मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना. यासाठी जबाबदार असलेल्यांना किंमत मोजावी लागेल. हिंदुस्थान हल्ला करेल’, असे गंभीरने पोस्ट केले.

सुट्टीवर असलेला गंभीर अलीकडेच फ्रान्समधून कौटुंबासह परतला आहे. मार्चमध्ये हिंदुस्थानच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदानंतर तो मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात राहिला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 सध्या सुरू असल्याने, राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांना सहसा स्पर्धेदरम्यान सुट्टी मिळते. गेल्या वर्षी जुलैमध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणारा गंभीर विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या जागी आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्व दहशतवाद्यांना ठार करा,  ‘शूट एट साइट’चे आदेश द्या…मोने, जोशी, लेले कुटुंबियांची मागणी सर्व दहशतवाद्यांना ठार करा, ‘शूट एट साइट’चे आदेश द्या…मोने, जोशी, लेले कुटुंबियांची मागणी
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील सहा जण महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांचे...
पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण…, पहलगाम हल्ल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या, उल्हासनगरमध्ये काय घडले?
‘तुम अपनी हद मे रहो…’ प्रेग्नंट कियारासमोर पापाराझींनी गर्दी केली; सिद्धार्थ मल्होत्रा भडकला
पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी; म्हणाली “माझंही रक्त खवळतं..”
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार आक्रमक! पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ बद्दल मोठा निर्णय
दहशतवादाविरोधातील अंतिम,निर्णायक लढाई! हल्लेखोर दहशतवादी आणि सूत्रधारांना अद्दल घडवणारच; पंतप्रधान मोदी यांची ग्वाही