क्रिकेटचे मैदान गाजवणारा डोंबिवलीतील ‘सचिन’ हरपला

क्रिकेटचे मैदान गाजवणारा डोंबिवलीतील ‘सचिन’ हरपला

संजयला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. परिसरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा ‘सचिन’ अशीच त्याची ओळख होती. गोरा रंग आणि कुरळे केस यामुळे सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना केली जात असे. डोंबिवलीतील क्रिकेटची मैदाने गाजवणारा आमचा ‘सचिन’ गेला हो.. असा टाहो संजय लेले यांचे बंधू माधव लेले यांनी डोंबिवली, फोडला तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या.

डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोडवरील ‘विजयश्री’ अपार्टमेंटमध्ये संजय लेले आणि त्याचे कुटुंब राहत होते. पत्नी कविता आणि मुलगा हर्षलसह ते सहलीसाठी कश्मीरला गेले. 18 मार्चला निघालेली ही सहल त्यांच्या आयुष्यातील अखेरची ठरली. संजय लेले एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांची पत्नी गृहिणी असून मुलगा हर्षल बँकिंग क्षेत्रात शिक्षण घेत आहे. सहलीला जाण्यापूर्वी संजयने फोन करून निघाल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत मावस भाऊ अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचे कुटुंबीयही होते.

दहशतवादी हल्ल्यात संजयचा मृत्यू झाल्याची बातमी डोंबिवलीत धडकली तेव्हा सारेच सुन्न झाले. संजयची पत्नी कविता आणि मुलगा हर्षल सुरक्षित असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आयुष्यातले दोन क्षण कुटुंबासह आनंदी करण्यासाठी गेलेल्या आमच्या भावाचा दहशतवाद्यांनी बळी घेतला. आता सरकार त्यांना जशास तसा जबाब देईल का, असा सवाल माधव लेले यांनी केला.

पत्नी आणि मुलीसमोरच अतुलच्या डोक्यात, छातीत गोळ्या झाडल्या; साडू राहुल अकुल यांचे शब्दही गोठले

आमचा योगाचा शिलेदार गेला

दिलीपराव यांनी निवृत्तीनंतर योगाचे व्रत अंगिकारले. त्यांनी असंख्य सदस्य योगा ग्रुपसाठी जोडले. अलीकडेच त्यांचा 67 वा वाढदिवस आम्ही साजरा केला. पण यापुढे ते दिसणार नाहीत असे क्षणभरही मनात आले नाही. योगाचा प्रसार करणारा आमचा शिलेदार हरपला अशी भावना दिलीप देसले यांचे मित्र आणि योगा ग्रुपचे सदस्य बळीराम देशमुख यांनी व्यक्त केली.

पनवेलच्या निसर्ग टुर्ससोबत दिलीप देसले पत्नीसह पहलगामला गेले होते. दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे दिलीप देसले हे गेल्या काही वर्षांपासून योगा ग्रुपसोबत जोडले गेले होते. 2 एप्रिलला या योगा ग्रुपचा आठवा वर्धापनदिन साजरा करण्यात दिलीपरावांचा मोठा वाटा होता. पण आता दिलीपरावांच्या फक्त आठवणी उरल्या आहेत, अशी भावना योगा ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केली.

पाटील दाम्पत्य जखमी

पनवेल येथील ‘निसर्ग’ ट्रॅव्हल्समधून 39 पर्यटक जम्मू कश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. त्यात पनवेलमधील सुबोध पाटील, माणिक पाटील हे दाम्पत्य गोळीबारात जखमी झाले. त्यांना श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये एअर लिफ्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. माणिक पाटील हे सेवानिवृत्त कस्टम अधिकारी आहेत. उर्वरित सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सरकारी बाबूंचे लाड बंद! आता पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास मोठी कारवाई, महसूलमंत्र्यांच्या त्या आदेशाने प्रशासनात खळबळ सरकारी बाबूंचे लाड बंद! आता पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास मोठी कारवाई, महसूलमंत्र्यांच्या त्या आदेशाने प्रशासनात खळबळ
सध्या सरकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. पूर्व परवानगीशिवाय...
महेश भट्ट-पूजा भट्टच्या वादग्रस्त किसिंग फोटोबद्दल अखेर मुलाने सोडलं मौन; म्हणाला..
Ather Energy IPO – चालू आर्थिक वर्षातील पहिला मोठा IPO, एथर एनर्जी गुंतवणूकदारांना मालामाल करणार?
‘लाख’ मोलाचे सोने तीन हजार रुपयांनी स्वस्त
Jammu & Kashmir उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; एक जवान शहीद
अपील करण्याआधीच पंचांनी बोट वर केलं, आऊट न होताच ईशान किशन तंबूत परतला; MI vs SRH लढत अन् फिक्सिंगची चर्चा!
मी तुला मारेन! गौतम गंभीर याला ‘ISIS’ कडून धमकीचा मेल