मधु मंगेश कर्णिक यांच्या पाच पुस्तकांचे शुक्रवारी प्रकाशन
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक वयाची 95 वर्षे पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने (कोमसाप) येत्या 25 एप्रिल रोजी मधु मंगेश कर्णिक यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. कर्णिक यांची ‘स्मृतिजागर’, ‘गूढ-निगूढ’, ‘स्वयंभू’, ‘राजा थिबा’ व ‘उधाण’ ही पुस्तके मॅजेस्टिक, ग्रंथाली व उत्कर्ष या प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित होत आहेत. संगीतकार काwशल इनामदार हे कर्णिकांच्या कवितांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमही सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List