धारावीचा मास्टर प्लॅन दोन दिवसांत जाहीर होणार; काय मिळणार, काय नाही
अदानी समूहाकडून करण्यात येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन एक-दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पात्र आणि अपात्र धारावीकरांना नेमके कुठे आणि कसे वसवण्यात येणार आहे, त्यांच्यासाठी कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, याची माहिती धारावीकरांना मिळणार आहे, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
मुंबईतील 600 एकरवर पसरलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून होणार आहे. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानी समूह राज्य आणि मुंबई महापालिकेकडून मुंबईतील सुमारे दोन हजार एकरच्या अनेक मोक्याच्या जागा ताब्यात घेणार आहे. यात देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमधील शेकडो एकर जमिनीचाही समावेश आहे. मात्र प्रकल्पात कोणतीही पारदर्शकता नसल्याने अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला धारावीकरांनी जोरदार विरोध केला असून सर्वेक्षणातही भाग घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने जाहीर होणाऱ्या धारावीच्या मास्टर प्लॅनमध्ये नेमके काय आहे आणि त्याचे काय पडसाद उमटणार आहेत, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List