Pahalgam Terrorist Attack – ‘या’ Mobile App च्या मदतीने केले दहशतवादी हल्ले
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या हल्ल्याबाबत सतत नवनवीन खुलासे होत आहेत. मंगळवार पासूनच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात दहशतवाद्यांचे रेखाचित्रं आणि फोटो जारी करण्यात आले आहेत. दरम्यान आता त्यांच्याबाबत आणखी एक माहिती उघड झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पोहोचण्यासाठी एका खास मोबाईल अॅपचा वापर केल्याची माहिती मिळत आहे.
दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी अल्पाइन क्वेस्ट अॅप्लिकेशनचा वापर केला होता. याआधीही दहशतवाद्यांनी जम्मूच्या जंगलात हल्ले करण्यासाठी या अॅपचा वापर केला होता. या अॅपच्या सहाय्याने पहलगामच्या घनदाट जंगलातून बैसरन परिसरात पोहोचू शकले. हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणेपासून वाचण्यासाठी त्यांनी या अॅपचा वापर केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मोबाईल अॅप पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने बनवण्यात आले आहे. हे मोबाईल अॅप बनवल्यानंतर त्याच्या वापराबद्दल सीमेपलीकडील त्यांच्या हँडलर्सनी दहशतवाद्यांना योग्य प्रशिक्षण दिले. पहलगाम हल्ला हा लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा संयुक्त कट असल्याचे बोलले जात आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी तेथील यात्रेकरूंना आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे हेच या हल्ल्यामागचे ध्येय असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामागे लष्करची आघाडी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ असल्याचा संशय आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List