सिग्नल लाल असताना जाऊ दिले नाही, नशेबाज कार चालकाने दुचाकीला दिली धडक; दोघे गंभीर जखमी

सिग्नल लाल असताना जाऊ दिले नाही, नशेबाज कार चालकाने दुचाकीला दिली धडक; दोघे गंभीर जखमी

सिग्नल तोडून पुढे गेला नाही, म्हणून एका नशेबाज कार चालकाने पाठलाग करून कारची धडक देत दुचाकीस्वाराला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वाराच्या हेल्मेटमधील कॅमेर्‍यात हा थरार कैद झाला आहे. कारच्या जोरदार धडकेमध्ये दुचाकी चालक आणि पाठीमागे बसलेला एकजण हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार चालकाला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नाशिकच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात राहणारा प्रेम प्रफुल्ल बोंडे हा रविवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकीने त्र्यंबक रोडवरून जात होता. पाठीमागे त्याचा मामेभाऊ आर्यन पाटील बसलेला होता. सिबल हॉटेल सिग्नल लाल असल्याने तो थांबला. त्याच्या पाठीमागे असलेल्या एमएच 15 जेए 5558 या सेल्टॉस कार चालकाने हॉर्न वाजवून सिग्नल तोडून दुचाकी पुढे नेण्याचा इशारा केला. बोंडे याने सिग्नल तोडण्यास नकार दिला. हिरवा सिग्नल सुरू झाल्यानंतर तो त्र्यंबक रोडने पुढे निघाला. आपले न ऐकल्याचा राग आल्याने त्या कार चालकाने दुचाकीचा वेगात पाठलाग सुरू केला, धडक देवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात येताच दुचाकीचा वेग वाढवित बोंडे याने जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. एबीबी सर्कलहून सिटी सेंटर मॉल सिग्नलला वळसा घालून पुन्हा एबीबी सर्कलकडे जात असताना या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली, काही फूट लांब फरफटत नेले. यात आर्यनच्या डोक्याला, तर प्रेम बोंडे याच्या पायाला व पाठीला गंभीर दुखापत झाली. कारचे बंपर, नंबर प्लेट तुटून रस्त्यावर पडले. कार चालक फरार झाला. कार किया शोरूमला लावून तो घरी दडून बसला.

जखमी तरुणांना नातलगांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. गंगापूर पोलिसात धाव घेतली. नंबरप्लेटचे तुटलेले तुकडे जुळवून कार चालकाचा शोध घेण्यात आला. खडकाळी भागातील रहिवाशी शेख शाहरूख शेख या कार चालकाला अटक करण्यात आली. कार अंगावर घालून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. हा कार चालक नशेबाज असून, तो सराईत गुन्हेगार आहे. व्याजासह नशेचे पदार्थ विक्रीच्या अवैध व्यवसायाशी त्याचा संबंध आहे का, या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला ‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला
मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा...
आयबी, एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल, मोने-जोशी-लेले कुटुंबियांची करणार चौकशी
‘त्यांनी गोळीबार केला, माझा एक हात बाबांच्या डोक्यावर होता अन्…’ संजय लेलेंचा मुलगा भावुक
‘एवढी क्रूरता, हैवान…’, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी गायक संतापला; 9 वर्षांपूर्वी भारतात आला होता
‘बाप आहे नाना पाटेकर! निर्मात्याला घरी बोलावलं अन् भांडी घासून घेतली’, नेमकं काय झालं होतं?
‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया
लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?