‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया

‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया

नुकतंच नवजात बालकाचे प्राण वाचवणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या या कार्यानंतर सर्वत्र तिचीच चर्चा होत आहे. आता तिने पहलगाममधील दहशतवादी घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझं रक्त खवळत आहे. हा केवळ दहशतवादी हल्ला नाही, तर यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा पूर्णपणे सहभाग आहे” असे खुशबू म्हणाली आहे. तसेच पुढे तिने, आता युद्ध झालं पाहिजे असे देखील म्हटले आहे.

75 वर्षांपासून आम्ही सहन करत आहोत

खुशबूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, “पहलगाममध्ये काय झालं हे सर्वांना माहीत आहे आणि यालाच कलयुग म्हणतात. हे कलयुग आहे. असं म्हणतात की युद्ध हा शेवटचा पर्याय असावा. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा युद्ध लढलं जातं. मला वाटतं आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत. 75 वर्षांपासून आम्ही पाकिस्तानी आणि पाकिस्तानला सहन करत आहोत. प्रेम आणि शांतीचे खूप नाटक झाले.”

Pahalgam Terror Attack: भारतात दहशतवादी हल्ला होताच पाकिस्तानमधील लोकांनी गुगलवर काय सर्च केलं?

आता आरपारची लढाई झाली पाहिजे

खुशबू पुढे म्हणाली, “त्यांनी हिंदूंना मारलं. हा केवळ दहशतवादी हल्ला नाही, तर यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा पूर्ण सहभाग आहे. आपण दहशतवादी, दहशतवादी असं न करता पाकिस्तानी लष्कर असं म्हणायला हवं. भारतीय लष्करातील माजी मेजर म्हणून मी सांगू इच्छिते की, आपल्याकडे चांगली फौज आहे. 15 लाखांहून अधिक जवान आहेत. आता युद्ध झालं पाहिजे. याचा फार विचार करायला नको. असा कोणता धर्म आहे, असे कोणते पुस्तक आहे ज्यामध्ये लिहिलं आहे की तुम्ही निरपराध लोकांना मारू शकता?”

माझं रक्त खवळत आहे

खुशबूने आपला संताप व्यक्त करताना पुढे म्हटलं, “आपले लष्कर खूप चांगले आहे आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण दिलं गेलं आहे. ऑर्डर मिळण्याची तयारी झाली पाहिजे. याला हलक्यात घेऊ नये. कारण यांचा उद्देश फक्त जिहाद करणं आहे आणि त्यांना भारतीय आवडत नाहीत, मग ते कोणत्याही धर्माचे असो. माझं रक्त जळत आहे, खवळत आहे.”

दहशतवादाविरुद्ध एकजुट व्हायला हवं

खुशबूने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं, “मला ऐकून खूप बरं वाटलं की सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत आणि आशा आहे की त्या सर्व दहशतवाद्यांना लवकरच त्यांच्या कृत्यांचा परिणाम भोगावा लागेल. हा तो वेळ आहे जेव्हा सर्व भारतीयांनी दहशतवादाविरुद्ध एकजुट व्हायला हवं आणि आपल्या देशात शांती आणि सौहार्द आणण्यासाठी सरकारच्या निर्णयांचं प्रामाणिकपणे समर्थन करायला हवं. चला, आपण सर्व एकजुट होऊन काम करू.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – घरच्या मैदानावर ‘जोश’ दिसला अन् RCB चा ‘विराट’ विजय, राजस्थानचा केला पराभव IPL 2025 – घरच्या मैदानावर ‘जोश’ दिसला अन् RCB चा ‘विराट’ विजय, राजस्थानचा केला पराभव
घरच्या मैदानावर पराभवाची हॅट्रीक करणाऱ्या RCB ने दमदार पुनरागमन करत घरच्या मैदानावरच राजस्थानचा 11 धावांनी परभाव केला आहे. बंगळुरूने दिलेल्या...
Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
YMCA ची 150 वर्षे पूर्ण, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार
Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा
सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्यात सापडले पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू
Pahalgam Attack – सरकारच्या प्रत्येक अ‍ॅक्शनला आमचं समर्थन, सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांचं वक्तव्य