लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?
बॉलिवूडमध्ये घराणेशाही म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे कपूर कुटुंबाचं. त्यात कपूर कुटुंबातील अभिनेते ऋषी कपूर हे कायम चर्चेत असायचे ते त्यांच्या कडक स्वभावामुळे. त्यांचे ट्वीट असतील किंवा मग त्याचे कौटुंबिक वाद असतील. त्यांचे किस्से हे नेहमीच चर्चेत असायचे. ऋषी कपूर यांना पटकन राग यायचा असंही बऱ्याचदा म्हटलं जायचं.
ऋषी कपूर यांनी रणबीरला कानशिलात का लगावली होती?
पण त्यांनी याच रागात मुलगा रणबीर कपूरला जोरदार कानशिलात लगावली होती. रणबीरने अशी काहीतरी कृती केली होती की ती त्यांना सहन झाली नाही. म्हणून त्यांनी रणबीरला मारलं होतं. रणबीरने स्वत: हा किस्सा सांगितला आहे.
काही कौटुंबीक वादाचे प्रसंग सोडले तर रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्याशी खूप चांगले संबंध होते असं म्हटलं जायचं. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आणि किस्से आजही चर्चेत असतात. असाच एक किस्सा जो रणबीरने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. खरं तर एकदा रणबीर बूट घालून देवघरात आला तेव्हा ऋषी कपूर यांना प्रचंड राग आला होता.
रणबीरची ही कृती ऋषी कपूर यांना अजिबात आवडली नव्हती
एका मुलाखतीदरम्यान रणबीरने हा प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “मी नेहमीच माझ्या वडिलांचा चाहता राहिलो आहे. मला त्यांचे वेगवेगळे पात्र पहायला आवडतं. जरी माझे वडील कधीही माझ्यावर ओरडले नाहीत,तरी त्यांनी मी लहान असताना एकदा मला खूप जोरात कानशिलात लगावली होती. कारण मी पुजाघरात थेट बूट घालून गेलो होतो. तेव्हा मी सुमारे 12 वर्षांचा होतो.” त्यामुळे ऋषी संतापले आणि त्यांनी राग काढताना रणबीरवर हार उगारला. दरम्यान वडिलांच्या अशा अनेक आठवणी आहेत ज्याबद्दल रणबीर नेहमीच सांगत असतो.
रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास…
आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत रणबीरने ‘बर्फी’, ‘संजू’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘तू झुठी में मक्कर’, ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन’, ‘ॲनिमल’, रॉकस्टार, आणि ‘राजनीती’ सारखे अनेक हीट चित्रपट दिले आहेत. आता रणबीर 1 हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची तेवढीच उत्सुकता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List