‘बडे अच्छे लगे हैं’ फेम अभिनेत्रीचे 2 घटस्फोट, चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होताच म्हणाली…
‘बडे अच्छे लगे हैं’ फेम अभिनेत्री चाहत खन्ना तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर देखील चाहत हिला हवी तशी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली नाही. प्रोफेशनल आयुष्यासोबत चाहत हिला खासगी आयुष्यात देखील अनेक अडचणींचा समाना करावा लागला. दोन घटस्फोटानंतर चाहतच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची देखील चर्चा रंगली आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत चाहत हिने खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, दोन घटस्फोट झाल्यानंतर चाहतच्या चारित्र्यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. यावर अभिनेत्री मौन सोडलं आहे. ‘प्रत्येकाला असं वाटतं की चुकी स्त्रीचीच आहे. लोकं म्हणतात पहिला घटस्फोट झाला. दुसरा देखील घटस्फोट झाला. नक्कीच चुकी मुलीची असेल…’
‘मला सर्वांना सांगावं लागतं की, चूक माझी नाही. पण असं करुन मी पूर्णपणे थकली आहे. त्यामुळे आता असं वाटतं की बोला… जे बोलायचं आहे ते बोला. मी पण म्हणते की माझीच चूक आहे. अशा परिस्थितीत किती लोकांना तुम्ही समजवणार…’
‘अनेकांनी पोटगी घेतल्याचा आरोप माझ्यावर लावला आहे. अनेक जण मला गोल्ड डिगर म्हणाले आहे… मी काही केलं नसताना मला ऐकावं लागत आहे. माझ्या घराला पाहून म्हणतात घर तर घटस्फोटानंतर मिळालं असेल… जी पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे.’
चाहत पुढे म्हणाली, ‘माझं पहिलं लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झालं होतं. 16 व्या वर्षापासून माझं पहिल्या नवऱ्यासोबत अफेअर होतं. पण लग्नाआधी त्याची एक अट होती. मी लग्नानंतर काम न करचा घरीच बसावं… कुटुंबियांना देखील आमचं नातं मान्य नव्हतं.’
‘अशात 4 महिन्यात आमचा घटस्फोट झाला. दुसऱ्या लग्नात मला नवऱ्याने काम साडोयला सांगितलं नाही. मी सर्वकाही सांभाळून घेईल असं तो मला कायम म्हणायचा. घटस्फोट, ब्रेकअपमुळे फार वेदना होतात. विशेषतः जेव्हा तुम्ही आई – वडील असता… माझ्या दोन मुली आहे. घटस्फोटोनंतर एक मुलगी माझ्या जवळ असते, तर दुसरी मुलगी दुसरा पती फरहान याच्याकडे असते…’ असं देखील चाहत म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List