‘तुम अपनी हद मे रहो…’ प्रेग्नंट कियारासमोर पापाराझींनी गर्दी केली; सिद्धार्थ मल्होत्रा भडकला
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच आई-बाब होणार आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिल्यापासून, प्रेग्नंट कियाराची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. अलिकडेच, कियारा आणि सिद्धार्थच्या कारसमोर पापाराझींनी गर्दी करताच सिद्धार्थ संतापला. सिद्धार्थता हा व्हिडीओ व्हायल झाला आहे.
मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर सिद्धार्थ आणि कियारा स्पॉट
सिद्धार्थ आणि कियारा नुकतंच दोघांनाही मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं. तथापि, यावेळी दोघेही आनंदी मूडमध्ये दिसत नव्हते. यादरम्यान अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा राग शिगेला पोहोचला होता. नेहमीच शांत दिसणारा हा अभिनेता पापाराझींवर चांगलाच संतापला होता.त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सिद्धार्थ पापाराझींवर चांगलाच भडकला
व्हिडिओमध्ये सिद्धार्थने राखाडी रंगाचा टी-शर्ट, डोक्यावर काळी टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घातला आहे. तर, गाडीच्या आत बसलेल्या कियारा अडवाणी गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसली. कियाराला पाहून पापाराझींनी अचानक तिच्याभोवती गर्दी करायला सुरुवात केली होती. पापाराझी कॅमेरा कियाराच्या फार जवळ घेऊन येत होते. एवढंच नाही तर कियारा कारमध्ये बसल्यानंतर कारच्या दाराजवळ जाऊन तिचे फोटो घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. हे पाहून सिद्धार्थचा राग अनावर झाला. त्याने पापाराझींना फटकारलं. व्हिडिओमध्ये सिदार्थ म्हणताना दिसत आहे- ‘मागे जा… तु्म्ही तुमच्या मर्यादेत राहा.’ सिद्धार्थचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हिडीओवर सोशल मीडियावर चाहत्यांचा सिद्धार्थला पाठिंबा
यावर सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्सही येताना दिसत आहेत. काही युजर्सनी सिद्धार्थच्या या प्रतिक्रियेला योग्य म्हटलं आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिलं आहे की, ‘या पापाराझींना गर्भवती महिलेचा आदर कसा करायचा हे माहित नाही… सिद्धार्थने योग्यच केले.’ तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, ‘हे पापाराझी नेहमीच रस्ता अडवतात, त्याने त्यांना ओरडून योग्यच केलं.’ कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सिद्धार्थ शेवटचा ‘योद्धा’ चित्रपटात दिसला होता. तर कियारा शेवटची ‘गेम चेंजर’ मध्ये दिसली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List