औषधं की जिम.. कपिल शर्माचा बदललेला लूक पाहून आरोग्याविषयी काळजी व्यक्त; 92 किलोवरून इतकं वजन कमी

औषधं की जिम.. कपिल शर्माचा बदललेला लूक पाहून आरोग्याविषयी काळजी व्यक्त; 92 किलोवरून इतकं वजन कमी

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनची तयारी करतोय. यादरम्यान नुकतंच त्याला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. पापाराझींनी कपिलचे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले असून सोशल मीडियावर ते क्षणार्धात व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमधील कपिलचा बदललेला लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. कपिलचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. कपिलने बरंच वजन घटवलं असून काहींनी त्याचं कौतुक केलं तर काहींनी त्याच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली.

कपिल शर्माला बुधवारी दुपारी मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. यावेळी त्याने स्टायलिश को-ऑर्ड सेट परिधान केला होता. कपिलने त्याचं बरंच वजन घटवल्याने तो खूप बारिक दिसत होता. आधीच्या आणि आताच्या दिसण्यात बराच फरक जाणवस्याने नेटकरी सध्या त्याबद्दलच चर्चा करत आहेत. पापाराझींनी पोस्ट केलेल्या कपिलच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी कपिलच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. कपिल वजन कमी करण्यासाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ओझेम्पिक औषधांचा वापर करत असल्याचाही अंदाज काहींनी वर्तवला आहे. तर मद्यपानामुळे कपिलची अशी अवस्था झाल्याचंही काहींनी म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

कपिलची तब्येत ठीक नाही का’, असा सवाल एकाने केला. तर ‘तणावामुळे वजन कमी झालं की काय? अशी अवस्था का झाली’, असं दुसऱ्या युजरने विचारलंय. ‘कपिल जरा जास्तच बारिक झाला आहे. हा ओझेम्पिकचा परिणाम आहे की जिमचा’, असेही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. लॉकडाऊननंतर कपिलने त्याच्या फिटनेसकडे अधिक लक्ष दिलंय. 2020 मध्ये शूटिंगदरम्यान त्याने जवळपास अकरा किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला होता.

याआधी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या बारिक होण्यावरूनही नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. करण जोहरचं वजन बरंच कमी झाल्यामुळे अनेकांनी ओझेम्पिक ट्रेंडचा अंदाज वर्तवला होता. करण जोहरचे आताचे आणि आधीचे फोटो पाहिले की त्याच्यातील बदल स्पष्ट दिसून येतो. सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांमध्ये ‘ओझेम्पिक’ची क्रेझ पहायला मिळतेय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला ‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला
मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा...
आयबी, एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल, मोने-जोशी-लेले कुटुंबियांची करणार चौकशी
‘त्यांनी गोळीबार केला, माझा एक हात बाबांच्या डोक्यावर होता अन्…’ संजय लेलेंचा मुलगा भावुक
‘एवढी क्रूरता, हैवान…’, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी गायक संतापला; 9 वर्षांपूर्वी भारतात आला होता
‘बाप आहे नाना पाटेकर! निर्मात्याला घरी बोलावलं अन् भांडी घासून घेतली’, नेमकं काय झालं होतं?
‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया
लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?