‘ही तर बाई संत्या..’; अमृता खानविलकरच्या घरातील अजब नियम ऐकून नेटकऱ्यांना आली संतोष जुवेकरची आठवण

‘ही तर बाई संत्या..’; अमृता खानविलकरच्या घरातील अजब नियम ऐकून नेटकऱ्यांना आली संतोष जुवेकरची आठवण

अभिनेत्री अमृता खानविलकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घराविषयी आणि दररोजच्या रुटीनविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने सांगितलं की तिच्या घरात सकाळी 10 वाजताच्या आधी आणि रात्री 9 वाजल्यानंतर कोणालाच परवानगी नाही. मग अगदी या वेळेत कोणतीही मोलकरीण किंवा इस्त्रीचे कपडे देणाराही घरात येऊ शकत नाही, असं तिने स्पष्ट केलं. यामागचं कारणही अमृताने या मुलाखतीत सांगितलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

काय म्हणाली अमृता?

“माझा सकाळचा वेळ.. म्हणजे माझ्या घरात सकाळी दहाच्या आधी कोणालाच परवानगी नाही. कुठलीही मोलकरीण, जेवण बनवणारी किंवा मदतनीस असो.. इस्त्रीचे कपडे द्यायला कोणीतरी आलंय तरी परवानगी नाहीच. दहाच्या आधी आणि रात्री नऊनंतर माझ्या घरात कोणालाच परवानगी नाही. कारण तो माझा वेळ आहे,” असं ती म्हणाली.

यामागचं सविस्तर कारण सांगताना अमृता पुढे म्हणाली, “मी सकाळी सर्वसाधारणपणे पाच-साडेपाचला उठते. त्यानंतर योगा, घरातली पूजा वगैरे करते. मेडिटेशन आणि जर्नलिंगसुद्धा करते. हे सगळं मला कधीच शिकवलं गेलेलं नाही. हे मी माझं माझं हळूहळू शिकत गेले. अच्छा.. हे केल्यावर हे होतं, खूप भावना मनात दडल्या आहेत, मग त्या मी कोणाला सांगू? सांगितल्याशिवाय त्या लिहून काढायच्या. मी अनेकवेळा दोन-दोन तास लिहित बसली आहे. माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळात मी इतकं लिहिलंय, इतकं लिहिलंय की आता त्या डायऱ्या कोणाला सापडल्या तर बापरे देव जाणे काय होईल. तिथे लॉकरमध्ये ठेवते. पण हे मी केलंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलंय. ‘बाई संत्या..’ अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘नवरा नऊच्या नंतर आला तर’ असा उपरोधिक सवाल दुसऱ्याने केला. ‘कधी काही इमर्जन्सी असेल तर काय करणार’, असंही अनेकांनी म्हटलंय. काहींनी अमृताच्या या नियमाचं कौतुकसुद्धा केलंय. ‘आवडली मलापण ही शिस्त. आपलं आयुष्य, आपला अधिकार, लोकांना आपल्या मधे मेधे नको.. हे माझंपण असंच असतं’, असं नेटकऱ्याने लिहिलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला ‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला
मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा...
आयबी, एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल, मोने-जोशी-लेले कुटुंबियांची करणार चौकशी
‘त्यांनी गोळीबार केला, माझा एक हात बाबांच्या डोक्यावर होता अन्…’ संजय लेलेंचा मुलगा भावुक
‘एवढी क्रूरता, हैवान…’, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी गायक संतापला; 9 वर्षांपूर्वी भारतात आला होता
‘बाप आहे नाना पाटेकर! निर्मात्याला घरी बोलावलं अन् भांडी घासून घेतली’, नेमकं काय झालं होतं?
‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया
लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?