सरकारचा मोठा निर्णय; हे ओळखपत्र नसल्यास शेतकर्‍यांना वार्षिक 12 हजार रुपयांना मुकावे लागणार, तीन दिवसानंतर सवलतीही बंद, तुम्ही हा ID काढला की नाही?

सरकारचा मोठा निर्णय; हे ओळखपत्र नसल्यास शेतकर्‍यांना वार्षिक 12 हजार रुपयांना मुकावे लागणार, तीन दिवसानंतर सवलतीही बंद, तुम्ही हा ID काढला की नाही?

राज्यातील शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (Farmer ID) आवश्यक असणार आहे. या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी आयडी नाही, त्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही. या दोन योजनांद्वारे पात्र शेतकर्‍यांना वर्षाला एकूण १२,००० रुपये मिळतात. जर हे आयडी कार्ड नसेल तर कदाचित ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार नाही. शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसेल.

७० लाख शेतकर्‍यांना फटका

राज्यात सध्या १.७१ कोटी नोंदणीकृत शेतकरी असून, यापैकी सुमारे १ कोटींनीच शेतकरी आयडी घेतला आहे. म्हणजेच ७० लाख शेतकरी – ४१% – अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत. हा आयडी केंद्र सरकारच्या ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ उपक्रमाचा भाग असून, यामध्ये शेतकर्‍यांचे जमीन अभिलेख, पिक पद्धती, जनावरांची मालकी आणि शासकीय लाभ यांचा डिजिटल डेटा एकत्रित केला जात आहे. प्रत्येक शेतकर्‍याचा आधार क्रमांक या डेटाशी जोडला जाईल.

सरकारी योजनांवर पाणी

प्रशासनाने वारंवार आवाहन करुनही शेतकऱ्यांकडून शेतकरी ओळख क्रमांक कार्ड काढण्यात दिरंगाई होत असल्याचे समोर येत आहे. अनेक तालुक्यात उद्दिष्ट गाठण्यात आलेले नाही. कृषी विभागाच्या सर्व योजना यापुढे शेतकर्‍यांच्या ओळख क्रमांकाशी निगडीत करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी, पिक विमा, महाडीबीटीवरील सर्व योजना, पोक्रा योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक कर्ज यासारख्या योजना आणि सुविधांपासून शेतकरी यापुढे वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार, ग्राम कृषी विकास समित्या, सीएससी आणि फील्ड स्तरावरील यंत्रणांच्या सहाय्याने नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यात यावे. दरम्यान, किसान सभेचे अजित नवले यांनी या उपक्रमावर शंका व्यक्त करत म्हटले, “ही योजना शेतकऱ्यांसाठी नाही, तर कृषी क्षेत्रातील कॉर्पोरेट्ससाठी आहे.” शेतकरी ओळक क्रमांक – शेतकरी आयडी काढण्याची अखेरची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी १५ एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, सलमानची गाडी बॉम्बने उडवून देऊ, सलमानच्या घरात घुसून त्यालाही...
वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले, दोनदा घटस्फोट; इस्लाम स्वीकारुनही भांडणे.. पोटगी न घेताच करतेय मुलीचा सांभाळ
सैफ अली खानचे भुतांनी झपाटलेले घर; रात्रीतून करावं लागलं रिकामं, सोहाने सांगितला भयानक किस्सा
‘अश्लीलता आहे ही…’ काजोलची बहीण तनिषाचा ड्रेस पाहून संतापले नेटकरी
उंदरांमुळे होतात हे धोकादायक आजार, एकदा नक्की वाचा
5 दिवसानंतर मुंबईकरांना दिलासा, टँकर चालक असोसिएशनचा संप अखेर मागे
IPL 2025 – थला फॉर नो रिझन… 55 हजार पाण्यात गेले, CSK च्या कामगिरीवर बच्चे कंपनी नाराज; Video व्हायरल