मल्लिकाच्या छातीत सिलिकॉन..; अदिती रावचं वक्तव्य ऐकून चकीत झाला रणदीप हुड्डा

मल्लिकाच्या छातीत सिलिकॉन..; अदिती रावचं वक्तव्य ऐकून चकीत झाला रणदीप हुड्डा

अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच तिच्या बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत राहिली आहे. 2003 मध्ये ‘मर्डर’ या चित्रपटातील भूमिकेतून तिने सर्वांनाच थक्क केलं होतं. यानंतर 2011 मध्ये ‘मर्डर 2’ आणि 2013 मध्ये ‘मर्डर 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘मर्डर 3’ या चित्रपटाच्या प्रमोशनला अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि रणदीप हुड्डा यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुलाखतीत अदितीने मल्लिकाबद्दल असं काही वक्तव्य केलं होतं, ज्याची जोरदार चर्चा झाली होती. मल्लिका शेरावतच्या दिसण्यावरून अदितीने ही उपरोधिक कमेंट केली होती. तिची कमेंट ऐकल्यानंतर बाजूला उभा असलेला रणदीपसुद्धा चकीत झाला होता.

अदितीच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये अदिताला मल्लिकाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “माझ्या मते तुमच्या आत्म्यात स्टील असावा ना की छातीत सिलिकॉन.” अदितीच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर रणदीपला आश्चर्याचा धक्काच बसला होता. तो लगेच तिला विचारतो, “स्टील कुठे?” त्यावर अदिती स्पष्ट करून सांगते, “तुमच्या छातीत..” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

Aditi Rao’s reply when she was asked about Mallika Sherawat……
byu/Secret-Attitude3672 inBollyBlindsNGossip

अदिती आपलं मत स्पष्ट करताना पुढे म्हणते, “माझ्या मते सेक्शुॲलिटी या गोष्टीशिवाय अजून बरंच काही असतं. मला वाटतं की धीट व्यक्ती बनण्यासाठी तुमचा आत्मा स्टीलचा असण्याची गरज आहे ना की सिलिकॉनचा. चित्रपटात सेक्शुॲलिटी आहे, परंतु यासाठी कारण आम्हाला ते हवंय, यासाठी नाही की ते दुसऱ्यांना हवंय.”

‘मर्डर 3’ हा ‘मर्डर’ फ्रँचाइजीमधला तिसरा भाग होता. पहिल्या दोन भागांमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. परंतु तिसरा भाग त्याने नाकारला होता. त्यानंतर रणदीप हुड्डाने त्यात मुख्य भूमिका साकारली. मुकेश भट्ट यांचा मुलगा विशेष भट्टने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 15 फेब्रुवारी 2013 रोजी ‘मर्डर 3’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरला होता. 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने फक्त 27 कोटी रुपये कमावले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘कंगना रणौत यांना हे शोभत नाही हे…,’ अभिनेता रणदीप हुड्डा याची नाव न घेता टीका ‘कंगना रणौत यांना हे शोभत नाही हे…,’ अभिनेता रणदीप हुड्डा याची नाव न घेता टीका
बॉलीवूडची अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगणा रणौत यांच्या वक्तव्यावरुन नेहमीच वाद होत असतात. कंगणा यांनी कायम बॉलीवूडच्या नेपोटीझमवर टीका केली...
श्रेय घेण्यासाठी भाजपने टँकर चालक असोसिएशनचा संप दोन दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं – आदित्य ठाकरे
बीडपेक्षा सिंधुदुर्गची अवस्था भयानक; तरुणाला नग्न करत मारहाण करून केली हत्या; सिद्धेश शिरसाटचा आका कोण?
Solapur News – कुंभारी टोल नाक्याजवळ एसटी बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवासी सुखरुप
CSK Vs LSG – खलील अहमदने पहिल्याच षटकात विकेट घेतं विक्रमाला घातली गवसणी
सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य
वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले, दोनदा घटस्फोट; इस्लाम स्वीकारुनही भांडणे.. पोटगी न घेताच करतेय मुलीचा सांभाळ