‘रेखा पुरुषांसाठी वेडी आहे,ती त्यांना फसवते अन्…’ या अभिनेत्रीने रेखावर केला गंभीर आरोप
हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा त्यांच्या सौंदर्यासोबतच आणि दमदार अभिनयासाठीही प्रसिद्ध आहे. एक काळ असा होता जेव्हा बहुतेक कलाकार त्यांच्या चित्रपटांमध्ये रेखाला नायिका म्हणून पसंत करायचे. रेखा यांनी मोठ्या कलाकारांसोबतही काम केले आहे.
पण रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा मात्र आजही होते. त्यांचे अनेकांसोबत नाव जोडले गेले. तसेच रेखाने त्यांच्या आयुष्यात अनेक शत्रू बनवले असेही म्हटलं जातं. एक काळ असा होता जेव्हा सेलिब्रिटींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वजण रेखाच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी वेडे होते. रेखा यांचे व्यावसायिक आयुष्य खूप चांगले राहिले आहे पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमी वादात राहिलं आहे.
जया बच्चन रेखाचा तिरस्कार करायच्या
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे त्यामुळे रेखा आणि जया यांच्यातील वादाबद्दलही सर्वांना माहित आहे. मात्र यांच्याबद्दल या तिघांपैकी कोणीही भाष्य केलं नाही. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, जया बच्चन यांनी एकदा रेखाला सार्वजनिक ठिकाणी तिच्या पतीच्या अगदी जवळ उभे राहून त्याच्याशी बोलत असल्याबद्दल थप्पडही मारली होती. जया बच्चन यांच्यानंतर जर कोणी रेखाबद्दल द्वेष आणि राग करत असेल तर त्या अभिनेत्री नर्गिस दत्त
नर्गिस दत्त रेखाचा खूप द्वेष करत असे
दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त देखील रेखाचा खूप द्वेष करत असे. संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांना रेखा अजिबात आवडत नसत. 1984 मध्ये जेव्हा रेखा अभिनेता संजय दत्तसोबत ‘जमीन आसमान’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त आणि रेखा यांच्यातील अफेअर सुरू झाल्याचं म्हटलं जातं होतं. तथापि, रेखा किंवा संजय दत्त यांनी कधीही या अफेअरबद्दल भाष्य केलं नाही.
संजय दत्त आणि रेखा यांचे प्रेमसंबंध
संजय दत्तची आई नर्गिस दत्त अभिनेत्री रेखाचे नाव ऐकून रागावायची. जेव्हा संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांना कळले की त्यांचा मुलगा आणि रेखा यांचे प्रेमसंबंध आहेत, तेव्हा त्यांनी रेखाला खूप शिवीगाळ केली असल्याचं म्हटलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नर्गिस दत्तने एकदा शूटिंग सेटवरच रेखाला फटकारले होते.
नर्गिस दत्तने रेखाला डायन म्हटले होते
संजय दत्त आणि त्याचे वडील सुनील दत्त यांना जेव्हा कळले की नर्गिस चित्रीकरणाच्या सेटवर रेखाबद्दल जाहीरपणे वाईट बोलल्या होत्या तेव्हा त्यांना धक्का बसला. खरंतर, रेखा आणि संजय यांच्यातील जवळीकतेमुळे नर्गिस दत्त खूप नाराज होत्या. एकदा रागाच्या भरात त्यांनी रेखाला चेटकीणही म्हटलं. नर्गिसने रेखाच्या व्यक्तिरेखेबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या असल्याचं म्हटलं जातं.
एका मुलाखतीत नर्गिस यांनी रेखा यांच्याबद्दल सगळ्याच गोष्टी सांगितल्या होत्या
1976 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नर्गिस दत्त यांनी रेखाबद्दल उघडपणे सांगितलं होतं. नर्गिस यांनी कॅमेऱ्यासमोर रेखाबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नर्गिस यांनी मुलाखतीत म्हटले होते की “रेखा पुरुषांना तिच्या जाळ्यात अडकवत राहते. तिला आयुष्यात एका खंबीर पुरूषाची गरज आहे. काही लोकांच्या नजरेत ती एखाद्या चेटकीणीपेक्षा कमी नाही.तिने माझ्या मुलापासून दूर राहावे. तिने माझ्या मुलालाही अडकवलं” असे नर्गिस यांनी म्हटलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List