शिव रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे करमाळ्यात ‘शोले स्टाईल’ आंदोलन ! महिलांच्या रुद्रावताराने प्रशासनाची तारांबळ

शिव रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे करमाळ्यात ‘शोले स्टाईल’ आंदोलन ! महिलांच्या रुद्रावताराने प्रशासनाची तारांबळ

तालुक्यातील आळसुंदे- वरकुटे शिवरस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात सामाजिक कार्यकर्ते राणा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आळसुंदे ग्रामस्थांकडून करमाळा-कुडुवाडी रस्त्यावर जेसीबीवर चढून ‘शोले स्टाईल’ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतीसाठी पर्यायी रस्ता अथवा शिव रस्त्याविषयी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्यावरून न उठण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारपर्यंत चालू राहिल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आंदोलनकर्ते राणा वाघमारे हे जेसीबीवर चढून ‘शोले स्टाईल’ने आंदोलन करत असताना त्यांना खाली घेण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी आंदोलनस्थळी बोलाविण्यात आली. त्याचवेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी महिलांच्या अंगावर अग्निशमन गाडी घालण्याचा प्रयत्नही केला गेला. तसेच आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाच्या वतीने 60 ते 70 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

आंदोलनकर्ते व आळसुंदे ग्रामस्थ ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय रस्त्यावरून हटत नसल्याने दुपारी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मध्यस्थी केली व त्यानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनानंतर पुन्हा एकदा आळसुंदे ग्रामस्थांना आळसुंदे व वरकुटे गावाचे गाव नकाशासह शिवरस्त्याची हद्द व खुणा निश्चित करून शिवरस्ता खुला करून देण्याबाबतचे लेखी आश्वासन देण्यात आले.

या अगोदरही आळसुंदे-वरकुटे शिवरस्त्यासाठी आंदोलनकर्ते राणा वाघमारे यांच्यासह आळसुंदे ग्रामस्थ 24 फेब्रुवारी रोजी शिवरस्त्यावरच आमरण उपोषणासाठी बसले होते. त्यावेळी प्रशासनाच्या मध्यस्थीने 28 फेब्रुवारीला आळसुंदे-वरकुटे शिव रस्ता खुला करण्यात येईल, असे तहसीलदारांकडून लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा आळसुंदे ग्रामस्थांना ‘रास्ता रोको’ आंदोलन करावे लागले.

यावेळी ‘रास्ता रोको’ आंदोलनासाठी जोतिराम घाडगे, संजय धारेकर, शहाजी घाडगे, अभिमान घाडगे, श्रीकांत येवले, सचिन सरवदे, शहाजी देवकते, अशोक घाडगे, तात्या सरडे, आगतराव बेडकुते, गणेश टकले, किशोर शिंदे, रामराजे डोलारे, गणेश भांडवलकर, बालाजी घाडगे, रामभाऊ हांडे, गणेश देवकते, अतुल माने, नवनाथ सरवदे, गणेश माने, जयसिंग घाडगे, अक्षय घाडगे, परम मोरे, जयसिंग पाटील, नाना मोरे, अनिकेत घाडगे, राजू देवकते, आबा देवकते, महावीर घाडगे, श्रीराम पाडुळे, शुभम सपकाळ यांच्यासह महिला व आळसुंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य सलमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; करुणा शर्मांना वेगळाच संशय, केलं मोठं वक्तव्य
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, सलमानची गाडी बॉम्बने उडवून देऊ, सलमानच्या घरात घुसून त्यालाही...
वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले, दोनदा घटस्फोट; इस्लाम स्वीकारुनही भांडणे.. पोटगी न घेताच करतेय मुलीचा सांभाळ
सैफ अली खानचे भुतांनी झपाटलेले घर; रात्रीतून करावं लागलं रिकामं, सोहाने सांगितला भयानक किस्सा
‘अश्लीलता आहे ही…’ काजोलची बहीण तनिषाचा ड्रेस पाहून संतापले नेटकरी
उंदरांमुळे होतात हे धोकादायक आजार, एकदा नक्की वाचा
5 दिवसानंतर मुंबईकरांना दिलासा, टँकर चालक असोसिएशनचा संप अखेर मागे
IPL 2025 – थला फॉर नो रिझन… 55 हजार पाण्यात गेले, CSK च्या कामगिरीवर बच्चे कंपनी नाराज; Video व्हायरल