Hair Care-अंघोळीआधी फक्त दहा मिनिटे केसांना दही लावून ठेवा; केस होतील मऊ मुलायम, चमकदार! वाचा सविस्तर

Hair Care-अंघोळीआधी फक्त दहा मिनिटे केसांना दही लावून ठेवा; केस होतील मऊ मुलायम, चमकदार! वाचा सविस्तर

आपल्या सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये केसांची निगा राखणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची अक्षरशः वाट लागली आहे. महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होता. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि कोणता आहार घेतो यावर अवलंबून असते. केसांची काळजी घेण्यासाठी तेल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या तेलाच्या जोडीने इतर केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना सोप्पे मास्क लावून केसगळती थांबवू शकतो. घरगुती उपाय केसांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. साधे सोपे घरगुती उपाय खास तुमच्यासाठी

  केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा. किमान 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे.

 

 केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दहीमध्ये केसांसाठी आवश्यक असणारी  खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.

 

केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस  20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

 

ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडासा दही मिसळा आणि केसांना आणि टाळूवर लावा. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि केसांमध्ये चमक आणण्यासाठी ऑलिव्ह तेल सर्वोत्तम आहे.

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी केळी आणि मध हे एक उत्तम कॅम्बिनेशन आहे. कोरड्या केसांसाठी केळी आणि मध एकत्र करून केसांना लावावे. हा केसांचा मास्क किमान 15 मिनिटे ठेवावा. केस मऊसुत होण्यास मदत होते.

 

अकाली केस पांढरे होणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येते. आवळाचा रस, लिंबाचा रस, नारळ तेल समप्रमाणात घ्यावे. या मिश्रणाने केसांच्या मूळाशी मालिश करावी. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध लागतो.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची ही सक्तीची घुसखोरी वादात अडकली आहे. मनसेच नाही...
‘पैसे कमावण्यासाठी मी कोणत्याही…’, 6 कोटींची गुंतवणूक, शिल्पा शेट्टीला 573% फायदा, असं केलं तरी काय?
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; अजान रोखण्याचा केल्याचा प्रयत्न आरोप
भाजपच्या आशीर्वादानेच पालिकेत भ्रष्टाचार! प्रशासकांच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा
नाव ‘चितळें’चे, पण बाकरवडी भलतीच
आयब्रोज विरळ आहेत धड आकारही नाहीये, मग आता चिंता सोडा! घरच्या घरी या उपायांनी आयब्रोजला द्या नवा लूक
रेश्मा केवलरमानी जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत, हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला