मोदी–शहांचे विरोधक भाजप अध्यक्ष पदासाठी, संजय जोशींच्या नावाची चर्चा

मोदी–शहांचे विरोधक भाजप अध्यक्ष पदासाठी, संजय जोशींच्या नावाची चर्चा

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणे अपेक्षित होते. मात्र, मागील आठ-दहा महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. यासाठी मोदी समर्थक धमेंद्र प्रधान, भुपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर यांची नावे आघाडीवर होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीनंतर मोदी-शहांचे कट्टर विरोधक संजय जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरू आहे.

भाजपने आगामी काळात बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आदी राज्यांत होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल पाहायला मिळणार आहेत. माजी संघटन मंत्री संजय जोशी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत जोशी यांना पक्षसंघटनेत सक्रीय करण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

संघप्रचारक असलेल्या संजय जोशी यांचे संघटनात्मक काwशल्य पाहून 1988 मध्ये संघानं त्यांना गुजरात भाजपमध्ये सक्रिय होण्यास सांगितलं. तेव्हा राज्यात गुजरातची स्थिती चांगली नव्हती. जोशी 1988 ते 1995 दरम्यान राज्यात सक्रिय राहिले. गुजरातमध्ये भाजपला मजबूत स्थिती नेण्यात जोशींचा मोठा वाटा राहिला असून 1998 मध्ये त्यांनी राज्यात भाजप सरकार आणलं. जोशी यांच्याबाबतच आक्षेपार्ह सीडी प्रकरण, नरेंद्र मोदींशी झालेले मतभेद यामुळे 2014 मध्ये त्यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतरही संजय जोशी प्रचारक म्हणून सक्रिय राहिले.

समर्थकांची मोर्चेबांधणी

बंगळुरू येथे 18 एप्रिला होणाऱया भाजपच्या राष्ट्रीय परिषदेपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय जोशी यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

6 एप्रिलला जोशी यांच्या वाढदिवशी दिल्लीतील गोल मार्केट परिसरात त्यांच्या पाठीराख्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचाही समावेश होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची ही सक्तीची घुसखोरी वादात अडकली आहे. मनसेच नाही...
‘पैसे कमावण्यासाठी मी कोणत्याही…’, 6 कोटींची गुंतवणूक, शिल्पा शेट्टीला 573% फायदा, असं केलं तरी काय?
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; अजान रोखण्याचा केल्याचा प्रयत्न आरोप
भाजपच्या आशीर्वादानेच पालिकेत भ्रष्टाचार! प्रशासकांच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा
नाव ‘चितळें’चे, पण बाकरवडी भलतीच
आयब्रोज विरळ आहेत धड आकारही नाहीये, मग आता चिंता सोडा! घरच्या घरी या उपायांनी आयब्रोजला द्या नवा लूक
रेश्मा केवलरमानी जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत, हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला