Hair Style- पोनी, पफ, वेणी, खजूर वेणी तुमची आवडती हेअर स्टाईल कुठली! आता हेअर स्टाइल करा झटक्यात..
हेअर स्टाइल म्हणजे खास कार्यक्रमांसाठी खूप गरजेची असते. खासकरुन घरगुती समारंभ, पार्टी, औपाचारिक भेटी अशा विविध कार्यक्रमांसाठी आपण नव-नव्या फॅशनचा विचार नेहमीच करत असतो. त्याचप्रमाणे हेअर स्टाईलदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. केसांमुळे स्त्रियांना एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी मेकओवरचा विचार होत असेल तर सर्वात पहिला विचार केला जातो तो हेअर स्टाईलचा.
मोकळे केस, पोनी, पफ, वेणी याव्यतिरिक्त आपल्याला स्टाईलची माहिती नसते. मात्र गुगल प्ले स्टोअरवर असे काही अॅप्स आले आहेत जे हेअर स्टाईल कशी करावी यांची परिपूर्ण माहिती देतात. काही वेळा केसांना वेगळा लूक देण्यासाठी पार्लरमध्येही हजारो पैसे खर्च केले जातात. कामाच्या व्यापात आपल्याला केसांना वेगळा लूक देण्यासाठी वेळ मिळत नाही.
मोकळे केस ठेवण्याची इच्छा प्रत्येकीचीच असते, परंतु मोकळे केस मेंटेन करणं प्रत्येकीला जमत नाही.. मोकळे केस ठेवण्याचेही विविध उपाय आपल्याला हेअर स्टायलिंग अॅपमधून पाहता येतील. ३ ते ५ मिनिटांत केस बांधणे, बँग- फ्रींग हेअरस्टाईल असे अनेक प्रकार आपल्याला आता सहजसुलभपणे पाहता येतील. लहान मुलींपासून ते ऑफिसला जाणा-या प्रोफेशनल तरुणींसाठी विविध हेअरस्टाईल आता सध्या कोणत्याही हेअर स्टाईल अॅपमध्ये आपल्याला बघायला मिळतील.
आजकाल प्रत्येक ड्रेसवर वेणी बांधण्याचा नवा ट्रेंड आला आहे. पारंपरिक लूकपासून ते वेस्टर्न लूकपर्यंतच्या प्रत्येक स्टाईलवर वेणी बांधली जाते. त्यातही लांबसडक केस असले की खजूर वेणी, साधी वेणी सर्रास बांधल्या जातात. नेहमीच्या साध्या वाटणा-या वेणीला वेगळा लूक कसा द्यायचा हेही आपण अनेक मार्गांनी जाणून घेऊ शकतो.
ट्विस्ट ब्राईड, लेस ब्राईड, वॉटरफॉल ब्राईड, फिश टेल (खजूर वेणी), क्रॉस ब्राईड, फ्रेंच ब्राईड, ट्रिपल ब्राईड, शॉर्ट हेअर ब्राईड, फ्रोजन ब्राईड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या आपल्याला कोणत्याही अॅपवर इंटरनेटवर पाहायला मिळतील.
घाईगडबडीमध्ये केस कसे बांधावे हा यक्ष प्रश्न आजकाल प्रत्येक महिलेला पडतो. त्यातही अगदी थोडया वेळात नव्या पद्धतीने केस कसे बांधायचे झाले तर अगदी कसं तरी केस बांधून महिला तयार होतात. एका बाजूला वेणी कशी बांधावी, पोनी बांधण्याचे विविध प्रकार सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List