देवेंद्र फडणवीसांची चाकरी करण्याची अमित शहांची मिंधे गटाला तंबी, संजय राऊत यांचा टोला
शंभूराज देसाई यांनी बेडकासारखी काँग्रेस पक्षातून उडी मारली ते आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाबे ठाकरे आणि आनंद दिघेंबद्दल काय शिकवणार असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच देवेंद्र फडणवीसांची चाकरी करा अशी तंबी अमित शहा यांनी मिंधे गटाला तंबी दिली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षातून आलेल्या शंभुराज देसाई हे आम्हाला शिकवणार का? काँग्रेस पक्षातून बेडकासारखी उडी मारून आलेल्या शंभुराज देसाई हे आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्हाला शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. देसाई यांनी इतिहास वाचावा. गद्दारांना क्षमा नाही या विषयावरती संपूर्ण खटला चालला तो खटला काय होता आणि त्यात संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या पोकळ शंभूनी समजून घ्यावं. हे सगळे भैसटलेले, भरकटलेले आहेत. त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांनी त्यांना तंबी दिलेली आहे. की फडणवीसांची चाकरी करा नाहीतर सरकारमधून दूर व्हा. तुमच्या शिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे की त्यांच्या काय चर्चा असतात. आता हे खातेपिती घर सोडून कसे निघतील बाहेर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेल आहे, इथेच राहूया, आपण भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. त्यांनी आम्हाला धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे शिकवू नये असे संजय राऊत म्हणाले.
लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा हा तुमचा धर्म आहे. नव्या धर्मवीरांचा हा धर्म आहे. एकेकाळी अंडरवल्डचे लोक अशा प्रकारच्या धमक्या द्यायचेय, माणसं मारायची, माणसांचे अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे लोक टोळ्या चालवत आहे. शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार. अमित शहा यांनी गुजरातमध्ये जे चालवलं तोच पॅटर्न महाराष्ट्रात आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत. अमित शहा त्यांच्या पक्षाचे पावित्र जपतायत, पण एसंशि आमि अजित पवार हे त्यांची पूर्ण वाट लावणार असे संजय राऊत म्हणाले.
गिरीष महाजन यांच मानसिक स्वास्थ्य का बिघडलय हे आपल्याला माहिती आहे. ते अनेक खटल्यात अडकून पडलेले आहेत. त्यांना माहित नाही माननीय उद्धव ठाकरे यांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलेल होतं. मिस्टर महाजन जरा ऐकून या, कानातले बोळे काढा आणि ऐका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली होती. हे एसंशि गटाचे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा ते रायगडावर आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं. त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या होत्या. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला, एवढं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही करताय ना, खरोखर तुम्ही शिवभक्त असाल तर देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, एवढंच त्यानी सांगितलं. गिरीश माजनांना ऐकायला कमी येतय का? त्यांचा आरोग्य खताशी फार चांगला संबंध आहे, आम्ही त्यांना डॉक्टर देऊ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List